उरूस, 26 नोव्हेंबर 2020
गेली पाच सहा वर्षे पुरोगामी एक गोष्ट सतत मांडत होते की जेएनयु मधील विद्यार्थी समाजातील प्रश्नांवर आंदोलन करत आहेत. त्यांना देशद्रोही म्हणणे त्यांच्या विरोधात कसलेही पुरावे नसताना आरोप करणे चुक आहे. दिल्ली दंग्यांच्या खटल्याच्या निमित्ताने असे भक्कम पुरावे गोळा करून युएपीए अंतर्गत खटलाही दाखल झाला. शर्जिल इमाम आणि उमर खालीद यांना तुरूंगात डांबले गेले. पोलिसांनी या प्रकरणात 200 पानांचे नविन आरोपपत्र पहिल्या आरोप पत्राला पुरवणी म्हणून काल (25 नोव्हेंबर 2020) न्यायालयात सादर केले.
पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपपत्रात विविध तारखांसह अतिशय सविस्तर पद्धतीने हा कट कसा रचला ते मांडले आहे. पहिली तारीख आहे 4 डिसेंबर 2019. दिवशी मंत्रिमंडळाने सीएए संबंधी विधेयक मांडण्यास परवानगी दिली. नेमके या दिवसापासूनच सर्जिल इमामने उमर खालीदच्या सहाय्याने मुस्लीम विद्यार्थ्यांना एकजूट करण्यास प्रारंभ केला. जेएनयु मध्ये हा विद्यार्थी गट तयार करण्यात आला. त्याचे नाव ठेवले एम.एस.जे. (मुस्लीम स्टूडंटस ग्रुप ऑफ जेनयु). या व्हाटसअप गटात 70 विद्यार्थी होते.
6 डिसेंबरला बाबरी मस्जीदीच्या नावाने पत्रके विविध मस्जिदींमध्ये वाटण्यात आली. जेएनयु नंतर जामिया मिलीया येथील मुस्लीम विद्यार्थ्यांचा एक व्हाटसअप ग्रुप तयार करण्यात आला. त्याचे नाव होते एस.ओ.जे. (स्टूडंटस ऑफ जामिया). 13 डिसेंबरला जामिया मधील विद्यार्थी प्रदर्शने आणि हिंसा ही पूर्व नियोजीत होती. याचे पुरावे या व्हाटसअप ग्रुप मधील चॅटिंग मधून तपास यंत्रणांनी शोधून न्यायालया समोर मांडले आहे. या सगळ्याच्या मागे शर्जिल इमामचे डोके होते. शर्जिलची भडक भाषणे समोर आलेली आहेत. त्यांचेही पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केले आहेत. दिल्लीत दंगे भडकावून दिल्लीचे दुध पाणी बंद करण्याचा आपला इरादा शर्जिलने जाहिरच केलेला होता.
शर्जिलच्या भाषणांत कन्हैय्या कुमार आणि इतर डाव्यांची भाषणबाजी काही कामाची नाही याचाही उल्लेख आहे. यातून नुसते फोटो छापून येतात. प्रत्यक्षात काही उपयोग होत नाही. तेंव्हा आता लोकांच्या संतापाचा ‘प्रॉडक्टीव’ वापर आपल्याला आंदोलनासाठी करावयाचा आहे. अशी अतिशय स्पष्ट भडक भाषा शर्जिनले वापरली आहे.
15 डिसेंबरला शाहिन बागेत धरणं आंदोलनाची मुहूर्तमेढ अर्शद वारसीला हाताशी पकडून शर्जिलने रोवली.
दिल्ली विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचेही व्हाटसअप ग्रुप तयार करण्यात आले. आंदोलनाचा भडका पसरविण्यासाठी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. या सर्व बाबी याच व्हाटसअप ग्रुपच्या चॅटिंग मधून समोर आलेल्या आहेत. आपणच या शाहिनबाग आंदोलनाचा ‘मास्टर माईंड’ आहोत असेही शर्जिलने मुजम्मल नावाच्या मित्राला पाठवलेल्या मेसेज मध्ये समोर आले आहे.
2 जानोवारीपासून शर्जिल ने शाहिनबाग आंदोलन आपल्या इतर सहकार्यांवर सोपवले आणि तो इतर नियोजनावर काम करू लागला. 9 जानेवारीला जेएनयु मधील एक विद्यार्थीनी आफरीन हीच्याशी झालेल्या चॅटिंग मधून हे समोर येते आहे की शाहिनबागेत नविन आंदोलनकर्ते यावेत आणि त्या सोबतच इतर ठिकाणीही ही आंदोलने झाली पाहिजेत असे धोरण आखले गेले. विविध ठिकाणांहून आंदोलनासाठी रसद मिळले आणि नविन लोक यात समाविष्ट झाले पाहिजेत म्हणजे आंदोलन दीर्धकाळ चालेल. अचानक प्रचंड संख्येने लोक गोळा झाले पाहिजेत अशी ‘हॉंगकॉंग’वाले धोरण आखण्यात आले. ज्या पद्धतीनं हॉंगकॉंग मध्ये मोठ्या प्रमाणात सरकार विरोधी आंदोलनात जनता रस्त्यावर उतरली हे ते धोरण होते. याचा उद्देश सरळ सरळ गोंधळ माजवणे असाचा होतो. जर लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले तर शासनाला काहीच करता येत नाही. किंवा जर काही केले तर दंगा अजूनच उसळतो. अशी ही ‘हॉंगकॉंग’वाली स्टॅ्रटजी.
11 जानेवारीला डोनाल्ड ट्रंप यांची भारत भेट जाहिर झाली. लगेच त्या भेटी दरम्यान दिल्लीत दंगे करण्याची योजना शर्जिल उमर यांनी बनवली. 17 फेब्रुवारीला महाराष्ट्रात अमरावतीला उमर खालीदने डोनाल्ड ट्रंप भारतात येतील तेंव्हा लोक रस्त्यावर उतरतील असे वक्तव्य केलेले होते.
पोलिसांनी विविध पुरावे यापुर्वीही सादर केलेले आहेतच. इतरही पुरावे गोळा केलेले आहेत. याच काळात पैशाचे जे व्यवहार झाले त्यांचीही नोंद करण्यात आलेली आहेत.
येत्या 15 डिसेंबरला शाहिनबाग आंदोलनाला एक वर्षे पूर्ण होत आहे. वर्षभरातच तपास यंत्रणांनी अतिशय सक्षमपणे काम करून दंगेखोरांना तुरूंगात डांबून त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे सादर केले आहेत. आता यांची बाजू घेणारे जे तमाम पुरोगामी आहेत त्यांनी या आरोपांना उत्तर द्यावे.
याच पद्धतीने नक्षलवाद्यांच्या विरोधातही कार्यवाही चालू आहे. यातील कायद्याच्या बाबी अतिशय किचकिट आहेत. त्यांचा फायदा देशद्रोह्यांना मिळतो आणि सुरक्षा यंत्रणा तपास यंत्रणांना मात्र मोठे जिकीरीने सावधपणे काम करावे लागते. गुन्हेगार गुन्हा करून मोकळा होतो पण त्याचा गुन्हा सिद्ध करणे हे एक मोठे अवघड काम होवून बसते. कधी कधी वैतागुन असे म्हणावे वाटते की कायदा गुन्हेगारांना मदत करण्यासाठी बनविला आहे की काय? पण म्हणतात ना ‘सत्य परेशात हो सकता है पराजित नाही’ त्या प्रमाणे हळू हळू सत्य बाहेर येत आहे.
यावर मोजक्या वाहिन्या वगळता कुणी फारसे बोलायला तयार नाही. वरील सर्व घटनाक्रम रजत शर्मांच्या इंडिया टिव्ही ने काल (दि. 25 नोव्हेंबर 2020) ‘आज की बात’ कार्यक्रमात सविस्तर मांडला आहे.
यातील कायद्याची लढाई जी चालू आहे ती होत राहिल. पण आपण सामान्य जनतेचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे की आपण या देशद्रोह्यांना प्रतिष्ठा देणे बंद केले पाहिजे. या प्रश्नावर जेंव्हा जेंव्हा बुद्धीवादी म्हणवून घेणारे पुरोगामी दिशाभूल करतात तेंव्हा रोकले पाहिजे. त्यांना टोकदार प्रश्न विचारून पुरावे मागितले पाहिजेत. देशद्रोही वृत्तीचे समर्थन अवघडच नव्हे तर अशक्य करून टाकले पाहिजे.
आजही निखिल वागळे जेंव्हा वरवरा राव सारख्या नक्षलवाद्याचे समर्थन करतात तेंव्हा त्यांना रोकले पाहिजे. त्यांच्या या भाषणावर कडक प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहिजेत. समाज माध्यमाची मोठी ताकद आपल्या हाताशी आहे. आपण त्याचा वापर केला पाहिजे. सामान्य माणसांच्या मौनाचा अतिशय चुक अर्थ पुरोगामी लावतात. तेंव्हा त्यांना याची जाणीव करून दिली पाहिजे की तूमची आधारहीन असत्य देशद्रोही मांडणी आम्ही ऐकून घेणार नाहीत.
रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, न्यायालयीन लढाई लढणारे, चळवळ करणारे सामाजिक राजकीय कार्यकर्ते त्यांचें काम करत असतात. पण आम्ही सामान्य माणसं आहोत आम्ही काय करू शकतो? असं जेंव्हा जेंव्हा कुणी विचारतो तेंव्हा तेंव्हा मी त्यांना संागतो की तूम्ही किमान जे समाज माध्यम वापरत अहात त्यावर तूमची प्रतिक्रिया व्यक्त करा. तिथे शांत बसू नका. बायकोचा वाढदिवस, पोराचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, साहेबांचा वाढदिवस, कुठल्या सहलीच्या फोटोत प्राचीन वास्तुपेक्षा आपलाच मोठा फोटो दाखवण्यात जेवढा वेळ आणि ऊर्जा खर्च करता त्याच्या किमान 10 टक्के तरी इकडे खर्च करा. तरी खुप मोठा बदल घडण्यास सुरवात होईल.
दिल्ली दंग्यांचा कट उघडकीय आणणार्या सर्व तपास यंत्रणेचे मन:पूर्वक अभिनंदन. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तूमच्या पाठिशी आहोत. आमची कृती तूम्हाला मदत करणारी असेल. आपण सगळे मिळून देशाला लागलेली किड काढून टाकू. अशी आपण आज प्रतिज्ञा घेवू या. 26/11 च्या शहिदांना मृत्यूमुखी पडलेल्यांना हीच खरी श्रद्धांजली.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment