Wednesday, May 6, 2020

गर्भवती सफुरा झरगर- पुरोगामीत्वाला घरघर!


उरूस, 6 मे 2020

हा विषय इतर कुणी काढला असता तर त्यावर पुरोगाम्यांनी मोठा हल्ला चढवला असता. पण पुरोगाम्यांच्या गळ्यातल्या ताईत अशा पत्रकार सबा नकवी यांनीच ट्विट करून सफुरा झरगर यांच्या गर्भवतीपणाची वाच्यता केली. आणि अशा गर्भवती तरूणीला तुंरूंगात डांबणे किती योग्य आहे असा सवाल विचारला.

प्रकरण असं आहे. शाहिनबाग आंदोलन, जामिया मिलिया हिंसाचार, दिल्ली दंगे यात सक्रिय सहभाग असलेली या आदांलनाची ‘पोस्टर गर्ल’ सफुरा झरगर हीला पोलिसांनी दशहतवादी कारवायांसाठी उपा (यु.ए.पी.ए.) कायद्या अंतर्गत अटक केली. तिच्याविरूद्ध तसे सकृतदर्शनी पुरावे मिळाले. उमर खालीद, ताहिर हुसेन आणि अजूनही काही जणांना याच कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

सफुरा झरगर ही तुरूंगात असताना तिच्या वैद्यकिय तपासणीची वेळ आली आणि तिने नकार दिला. पण तुरूंगाच्या नियामाप्रमाणे कैद्यांची तपासणी करणे आवश्यक होते. त्यातही सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तर हे अजूनच आवश्यकच बनले आहे. या तपासणीत सफुरा दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.

हा विषय इथेही संपला असता. पण तसे काही झाले नाही. पुरोगामी पत्रकार सबा नकवी यांना आपण कोणता विषय समोर आणतो आहोत याचचे भान राहिले नाही. त्यांनी सफुराच्या बाजूने सहानुभूती उभी करावी म्हणून ट्विट केले. आणि आता तेच त्यांच्या अंगाशी येते आहे. केवळ सबा नकवीच नव्हे तर अन्य पुरोगामी पत्रकार महिलांनी तातडीने यावर ट्विट  केले. त्या सर्वांनाही हे प्रकरण असे अंगावर येईल याची जाणीव नसावी.

पहिली गोष्ट म्हणजे सफुरा कोणत्या गुन्ह्यासाठी तुरूंगात आहे? हे सबा सारख्या पत्रकार लपवून ठेवत आहेत. उपा कायदा हा अतिशय गंभीर अशा दहशतवादी कारवायांसाठी लावला जातो. दुसरी बाब सफुरा ही जामिया मिलिया मध्ये विद्यार्थी आहे. अशा विद्यार्थ्यांनी शाहिनबाग सारख्या आंदोलनात किंवा जाफराबाद हिंसाचारात सहभाग कितपत नोंदवावा? प्रत्यक्ष जामियातील आंदोलनातील सहभाग एकवेळ समजून घेता येउ शकतो.
शाहिनबाग आंदोलनातील विविध पैलू आता समोर येत चालले आहे. दुष्यंतकुमारचा शेर आहे

गम बढे आते है कातिल की निगाहों की तरहा
तूम छुपा लो मुझे दोस्त गुनाहों की तरहा

याच पद्धतीनं सफुरा सारखे गुन्हेगार सबा सारख्या पुरोगाम्यांना ‘हमे छुपा लो’ असंच जणू म्हणत आहेत.

सफुरा तीन महिन्यांची (दोन किंवा तीन अशी या पत्रकारांच्या ट्विट मध्येच तफावत आहे) गर्भवती आहे म्हणजे तीन महिन्यांपूर्वी ती कुठे होती? हा प्रश्‍न निर्माण होतो. शाहिनबाग आंदोलनाचे पितळ आता या ठिकाणी उघडे पडत जाते. 15 डिसेंबरला हे आंदोलन सुरू झाले. तेंव्हा सांगितले गेले होते की या महिला तिथेच ठाण मांडून आहेत. सीएए मागे घेतल्या शिवाय त्या तिथून उठणार नाहीत. या महिलांसोबतच आपली पोस्टर गर्ल सफुरा ही पण होती. तसा दावा सातत्याने तिनेच केला आहे. मग तीन चार महिन्यांपूर्वी म्हणजेच जानेवारीत ही जर तिथेच रहात होती तर त्या आंदोलन स्थळीच हीला गर्भधारणा झाली असे म्हणावे लागेल.

शिवाय नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह बाब म्हणजे सफुरा विवाहित नाही. आता हा जो नैतिक मुद्दा समोर येतो त्याला सबा नकवी किंवा इतर पुरोगामी पत्रकार विचारवंत काय उत्तर देणार आहेत?

सफुरा झरगर हीच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावायचा कुणाला हक्क नाही. आमचीही भूमिका अशीच आहे. सफुराचे आयुष्य तिचे तिचे आहे. तिने कुठल्या पुरूषाशी संबंध प्रस्थापित करून आपल्या मुलाला जन्म द्यावा हा सर्वस्वी तिचा प्रश्‍न आहे. पण सफुरा जानेवारी महिन्यात जर शाहिनबाग आंदोलनात सक्रिय होती असे दावे केले जात आहेत. तर शाहिनबाग आंदोलनस्थळी हे काय चालत होते? असा प्रश्‍न निर्माण होतो. तेंव्हा हा मुद्दा केवळ सफुरा पुरता मर्यादीत न राहता शाहिनबाग आंदोलनाच्या नैतिकेवर प्रश्‍न उपस्थित करतो.

फार आधीपासूनच शाहिनबाग आंदोलनावर प्रश्‍न उपस्थित केले गेले आहेत. एक तर अतिशय चुक मागणीसाठी हे आंदोलन सुरू झाले होते. सी.ए.ए.चा भारतीय मुसलमानांच्या नागरिकत्वाशी काहीच संबंध नाही. तसे स्पष्ट विधान कपिल सिब्बल यांनी राज्यसभेत केले आहेच. दुसरी बाब म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता 100 दिवस संपूर्णत: बंद ठेवणे हे पण इतर सामान्य नागरिकांच्या यातायात स्वातंत्र्याच्या विरोधी होते. तिसरी बाब आता सफुराच्या निमित्ताने समोर येते आहे ती म्हणजे यात किमान नैतिकता का पाळली जात नव्हती?

संविधान बचाव म्हणणारे आंदोलनाची साधन सुचिता मानत नाहीत का? तोंडाने बाबासाहेबांचे नाव घ्यायचे पण आंदोलन करत असताना चारित्र्य शुद्धीचे महत्त्व लक्षात घ्यायचे नाही हे कोणते धोरण आहे?

पुरोगामी एक विशिष्ट बाजूच सतत समोर ठेवतात. मुळ विषयाला बगल देवून ते बाकीचे प्रश्‍न समोर उपस्थित करतात. आता सफुराच्या गरोदरपणाचा मुद्दा समोर आणाताना तिला अटक़ कोणत्या गंभीर गुन्ह्यासाठी करण्यात आली आहे ते सांगत नाहीत. आनंद तेलतुंबडेंना अटक़ झाल्यावर ते कसे विद्वान आहेत, त्यांची पुस्तक देश विदेशात अभ्यास क्रमाला कशी लावण्यात आली आहेत असा दावा हे करतात. पण त्यांना नेमक्या कुठल्या कारणाने अटक करण्यात आली हे सांगत नाहीत. हा बुद्धीभेद करण्याचा प्रकार आहे.

सफुराला गंभीर गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे. यात तिच्या गरोदर असण्याचा काहीच संबंध नाही. ती मुसलमान असण्याचा आणि रमझानच्या महिन्यात अटक करण्यात आली हा प्रचार पण खोटा आहे. पुरोगाम्यांना इतकीच सफुराची चाड असेल तर तिच्या बाळाचा जो कुणी पिता असेल त्याला शोधून काढावं. आणि या बाळाची जन्मानंतरची जबाबदारी घेण्यास त्याला भाग पाडावं. हेच त्यांचे पुरोगामी कर्तव्य आहे. सबा नकवी सारख्यांनी सरकारला व्यवस्थेला या प्रश्‍नावर बाकी शहाणपण शिकवू नये. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

3 comments:

  1. एकदम सुंदर... सर खरंच हे प्रकरण सबा नकवी या पुरोगामी पत्रकार यांनी बाहेर आणले म्हणून बरे झाले नाही वर या वर सुद्धा वादंग निर्माण केला असता या पुरोगामी लोकांनी... सर्वोच्य न्यायालयाने शाहीनबाग विरुद्ध निर्णय दिल्यानंतर सुद्धा हे लोक 100 दिवस तिथे रस्ता अडवून बसले होते.. जर ह्यांना स्वतंत्र असेल तर मग ह्या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या लोकांना स्वतंत्र नाही का?? पण आपण असे प्रश्न विचारले की लगेच त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते... पण मग आम्हला नाही का स्वतंत्र??
    जिथे जिथे शाहीनबाग सारखे आंदोलन चालू होत्व तिथे तिथे लिहले होते आमचा CAA आणि NRC ला विरोध आहे.. परभणी मध्ये जे आंदोलन चालू होते तिथे सुद्धा हेच पोस्टर होते आज पण आहे.. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की NRC तर आजून सरकारने लागूच केली नाही तरी सुद्धा हे लोक अशी दिशाभूल का करत आहेत?? हे लोक दिशाभूल करत आहेत आणि पत्रकार सुद्धा अश्याच बातम्या देत होते.. त्यांनी कधीच ह्या लोकांना ह्या बद्दल विचारले नाही..
    सफुरा बद्दल सबा नकवी स्वतःच तोंडावर पडल्या.. कारण सबा जर गरोदर असेल तर तुम्ही म्हणाल्या प्रमाणे अनेक प्रश्न उपस्तिथ होतात.. हा जर प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आसला तरी नैतिक गुणांना सोडून आहे.. आणि हा प्रकार एका आंदोलन दरम्यान झाला आहे म्हणजे ह्या आंदोलनाच्या नैतिकतेकर प्रश्न उपस्तिथ होणारच...
    पुरोगामी पत्रकारांनी आता सफुरा हिच्या बाळाचे पिटा कोण आहेत हे शोधून काढून त्यांना त्याची जबाबदारी घ्यायला लावावी..

    ReplyDelete
  2. काही दिवसात हा विषय गायब झालेला दिसेल.. हे पुरोगामी षडयंत्र आहे...

    ReplyDelete
  3. The government will make sure that she is looked after well. Has proper medical care. Her diet will be healthy. Eventually she would deliver a healthy baby. Pray to Ambabai that she snd her baby are well looked after.

    Eventually she will be tried and face the due consequences. If she is punished, hope her family will take care of her baby and bring up as a good Indian.

    ReplyDelete