Tuesday, April 28, 2020

भाऊ तोरसेकरांनी काढले वागळेंचे वाभाडे !


उरूस, 28 एप्रिल 2020

पत्रकार निखिल वागळे यांना पालघर प्रकरणी केलेला व्हिडिओ आणि त्यानंतर पत्रकार अर्णब गोस्वामी वर केलेली चिखलफेक महागात पडताना दिसत आहे. एक तर काहीच कारण नसताना वागळे पालघर प्रकरणांत वचावचा बोलून बसले. त्यात परत त्यांनी केलेले खोटे ट्विट त्यांना अडचणीत आणणारे ठरले. हे कमी होते म्हणून की काय त्यांनी लगेच अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका करणारा त्यांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीवर ‘प्रकाश’ टाकणारा व्हिडिओ केला.

अर्णब गोस्वामी सोनिया गांधींवर केलेल्या टीकेसाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांची सरशी झाली असून न्यायालयाकडून त्यांना तीन आठवडे संरक्षणही मिळाले आहे. अर्णब यांनी वागळेंचा व्हिडिओ पाहिला असल्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी वागळे यांना उत्तर दिले नाही. मात्र ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी स्वत:चे नविन यु-ट्यूब चॅनेल प्रतिपक्ष यावरून निखिल वागळेंवर दोन व्हिडिओ काढून त्यांचे वाभाडे काढले आहेत. शिवाय पोस्टमन या दुसर्‍या चॅनेलवर पण एक व्हिडिओ टाकून वागळेंना अजूनच धूतले आहे.

पालघर प्रकरणापुरते स्वत:चे विवेचन वागळेंनी मर्यादीत ठेवले असते तर चालले असते. पण अर्णब गोस्वामीवर घसरण्याची वागळेंना काहीच गरज नव्हती. पण बुडत्याचा पाय खोलात तशी अवस्था वागळेंची झाली आहे.

आपल्या व्हिडिओत वागळेंनी काही चुका केल्या आहेत, खोटे संदर्भ सांगितले आहेत, घटनांची उलटा पालट केली आहे. वागळे स्वत:च्यात आधीच्या व्हिडिओत काय बोलतात हे ते स्वत:च लक्षात ठेवत नसावेत.

उदा. अर्णब गोस्वामी यांचा खटला तातडीने सर्वोच्च न्यायालयात कसा काय चालतो? गरिबांना सर्वोच्च न्यायालयात उभेही राहणे मुश्कील आहे. अर्णब यांच्यासाठी पैसे कोण उभे करतो? वगैरे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले आहेत. वागळे हे विसरले की नुकतेच त्यांनी संशयीत शहरी नक्षलवादी म्हणून आरोपी असलेले आनंद तेलतुुंबडे यांच्यावर एक व्हिडिओ केला आहे. त्यात आनंद तेलतुंबडे हे गरिबांचे दलितांचे शोषितांचे कसे प्रतिनिधी आहेत वगैरे वगैरे त्यांनी प्रतिपादन केले. पण याच तेलतुंबडे यांना नोव्हेंबर 2018 मध्ये तातडीने सर्वोच्च न्यायालयाने जामिन प्रश्‍नी दिलासा दिला. एकदा नव्हे तर दोनदा त्यांची याचिका या दीड वर्षांत सर्वोच्च न्यायालया समोर आली. आणि इतर कुठल्याही सामान्य माणसाला उपलब्ध होणार नाही अशी संधी तेलतुुंबडेंना मिळाली व दीड वर्ष तपास यंत्रणांना हुलकावणी देत त्यांना अटक टाळता आली.

आता वागळे यांनी अर्णब यांना प्रश्‍न विचारताना याचेही उत्तर द्यावे की तेलतुंबडें यांच्यासाठी सर्वोच्य न्यायालयात खटला चालविण्यासाठी कोणी पैसा पुरवला?

अर्णब यांचे रिपब्लिक चॅनेल चालविण्यासाठी उद्योजक राजीव चंद्रशेखर यांचा पैसा असल्याचे वागळे सांगत आहेत. खरं तर हे भांडवल कुणाचे आहे हे नेटवरून कुणालाही शोधता येते. त्यासाठी वागळेंसारख्या पत्रकाराची गरज नाही. भाउ तोरसेकर यांनी वागळे यांची आत्तापर्यंतची पत्रकारिता कुणाच्या पैशावर चालली असा रोख सवाल विचारत काळ्या पैशावर चाललेल्या या पत्रकारितेचे ढोंग उघड केले आहे.

वागळेंच्या निमित्ताने भाउ कुमार केतकर, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, प्रणव रॉय सर्वच पुरोगामी पत्रकारांची पत्रकारिता कशी काळ्या पैशावर चालते याची कुंडली मांडत आहेत.

पुरोगामी म्हणवून घेणार्‍या पत्रकारांचे ढोंग भाउ उघड करत आहेत हे फार महत्त्वाचे आहे. आनंद तेलतुंबडे प्रकरणात त्यांची तपास यंत्रणेसमोर शरणागती प्रसंगी प्रकाश आंबेडकरांच्या बरोबरीने आमदार कपिल पाटील दिसत असतात. हेच कपिल पाटील निखिल वागळेंवर काय आरोप करत होते? वागळे-कपिल पाटील हे भांडण काय आणि कसे होते? पुरोगाम्यांचे वकिल कपिल सिब्बल आणि पुरोगामी पत्रकार बरखा दत्त यांचे तिरंगा चॅनेलवरून कसे वाजले, कपिल सिब्बल यांनी कर्मचार्‍यांचे पैसे कसे बुडवले आणि त्याबद्दल आरडा ओरड बरखा दत्त यांनीच कशी केली असे कितीतरी मुद्दे भाउंनी मांडले आहेत.

जे रविशकुमार जगाला तत्त्वज्ञान शिकवतात, वागळेंसारखे त्यांना आदर्श प्रमाणपत्र देतात त्या एनडिटिव्ही चे मालक प्रणव रॉय यांच्यावर सध्या आर्थिक कारवाई चालू आहे. कर बुडविल्या प्रकरणी एनडिटिव्ही गंभीर आरोपांना तोंड देतो आहे. याची कुठलीही वाच्यता हे इतरांना शहाणपण शिकवणारे पत्रकार करत नाहीत.

पालघर प्रकरणांत ज्या पद्धतीनं सोनिया गांधी, कॉंग्रेस आणि सर्वच पुरोगामी म्हणवून घेणारे पत्रकार बुद्धिजीवी विचारवंत वागले ते सर्वच संशयास्पद आहे. आता जी नावे या प्रकरणांत समोर येत आहेत ती ख्रिश्‍चन मिशनर्‍यांची आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी अजूनही या प्रकरणी चकार शब्द काढला नाही. पालघर आरोपींमध्ये एकही मुसलमान नाही हे वागळे सांगतात पण आहेत कोण ते सांगत नाहीत. भाजपच्या सरपंच यात आहेत असे खोटे ट्विट वागळे करतात पण त्यांचे नाव पोलिसांच्या यादीत नाही हे दिसताच वागळेंची बोबडी वळते व दोनच तासात ट्विट वरून ते नाव काढून टाकतात.

प्रस्थापित पत्रकार सत्याची बाजू दडपून टाकत आहेत. अर्णब गोस्वामी सारखा पत्रकार पालघर हत्याकांडाला वाचा फोडत आहे तर हे सर्व त्याच्यावर तुटून पडले आहेत. भाऊ तोरसेकरांनी या ढोंगी पुरोगाम्यांना उघडं पाडण्याची सरळ स्वच्छ भूमिका घेतली आहे. अर्णब सारखा पत्रकारही चुकेल तिथे त्यालाही उघडं पाडूत असंही त्यांनी म्हटलं आहे ही भूमिका अतिशय योग्य अशी आहे.

आपल्या व्हिडिओला उत्तर देण्याचे तोरसेकरांचे आव्हान वागळे स्विकारतील असे दिसत नाही. भाउंचे तीन व्हिडिओ आले आहेत पण वागळेंचे अजून एकही उत्तर नाही. आपण वाट पाहू वागळे काय आणि कसे उत्तर देतात याची.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

10 comments:

  1. होय मी पाहिले भाऊंचे व्हिडिओ अप्रतिम. वागळे ला नागडा केलाय.

    ReplyDelete
  2. भाऊंनी ह्या सर्व पत्रकारांना आरसा दाखवला. पैशांसाठी किती खालच्या पातळीवर जातात असे पत्रकार. समाजात द्वेष पसरवणारे हाच यांचा मुळ धंदा. आपला आभारी आहे भाऊ.

    ReplyDelete
  3. भाऊंनी वागळे यांची पिसे काढली आहेत आता पुढील व्हिडीओत कपडे पण काढतील.जबरदस्त भाऊ.आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुमच्या रोखठोक आणि सच्ची पत्रकारितेला.

    ReplyDelete
  4. खरंच खरा पत्रकार काय असतो हे भाऊंन कडे पाहिल्यावर लक्षात येते.. खरंच खूप सुंदर विश्लेषण भाऊ करतात.. मला अलीकडेच औरंगाबाद मध्ये त्यांना पाटीदार भवन मधील कार्येक्रम ऐकण्याची संधी मिळाली.. 'संविधान बचाव, कोणापासून' यावर खूप सुंदर बोलले भाऊ..
    भाऊंनी बनवलेला विडिओ निखिल वागळे चे वाभाडे काढणारा आहे.. निखिल वागळे बद्दल कपिल पाटील काय म्हणाला हे जर ऐकले तर समजेल निखिल कोणत्या प्रकारची पत्रकारिता करतात.. इतरांना आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र देउ नका सांगणारे वागळे आता अर्णब ला पत्रकार नसल्याचे प्रमाणपत्र देत आहेत हे बरे चालते?? हा दुतोंडी पण नाही का??
    साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ह्यावर मौन बाळगून आहेत ह्यावर कोणीच काही बोलत नाही.. अर्णब यांनी जो पालघरचा मुद्दा उपस्तिथ केला होता त्याबद्दल सुद्धा काही बोलले जात नाही..
    बाकी भाऊ तोरसेकरांच्या विडिओ ला वागळे प्रतिउत्तर देतील असे वाटत नाही.. बघू काय होते ते

    ReplyDelete
  5. वागलेला सगळ्यांनी चांनेलानी लाथा मारून हकलेले तरी हा मुरखासरखा विधाने करत असतो डोकीवरील केस गेले बुधीही गेली कुत्रा आहे

    ReplyDelete
  6. भाऊंनी वाभाडे काढलेत. 👌👌
    लेखदेखील सुरेख मांडला आहे
    मस्त

    ReplyDelete
  7. आगदी बरोबर आहे

    ReplyDelete
  8. भाऊ भुमिका तटस्थपणे मांडतात, वागळेची ती बोंब आहे, तो केवळ हिंदुत्ववादिंच्या नेमकी विरूद्ध चुकीच्या पद्धतीने भुमिका मांडतो व खोटं रेटून बोलतो

    ReplyDelete
  9. वागळेने स्वतःचा फाजील शहाणपणा न दाखविला तरच बरे।

    ReplyDelete