Sunday, June 21, 2020

सफुराच्या बचावासाठी आंतरराष्ट्रीय दबाव!


उरूस, 21 जून 2020 

लदाखच्या गलवाल व्हॅलीतील चिनी सैन्याच्या धुसफुशीत एक बातमी काहीशी मागे पडली. दिल्ली दंग्यातील आरोपी सफुरा झरगर हीची जामिन याचिका सर्वौच्च न्यायालयासमोर 6 जून रोजी सादर झाली. सफुरा गरोदर असल्याने तिचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी तिच्यावतीने वकिलांनी मागणी केली होती. शिवाय तिच्यावरची गुन्ह्याची कलमं गैर पद्धतीनं लावण्यात आली आहेत वगैरे वगैरे दावे केल्या गेले.

ही याचिका सर्वौच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सफुरा प्रमाणेच इतरही काही गुन्हेगार महिला ज्या गर्भवती आहेत, काहींची प्रसुतीही याच तुरूंगात झालेली आहे, काही अगदी लहान बाळं सांभाळण्याची त्यांच्या खेळण्याची चांगली व्यवस्था तुरूंगात कशी आहे हे सरकारी पक्षाच्या वतीने व तुरूंग प्रशासनाच्या वतीने सर्वौच्च न्यायालयाला सप्रमाण पटवून देण्यात आलं. आणि सफुरासाठीचा हा बचावाचा प्रयत्न फसला.

पण इतक्यावर शांत बसतील तर ते पुरोगामी कसले. या जमात ए पुरोगामींनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या मदतीने ‘अमेरिकन बार असोसिएशन’च्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात मागणी केली की सफुरावर अन्याय झाला असून  तिला तुरूंगात टाकणे म्हणजे आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा भंग आहे. तिला ताबडतोब मुक्त करण्यात यायला हवे.

अमेरिकन बार असोसिएशन ची ही मागणी कुठल्या न्यूज पोर्टलनी उचलून धरली त्यांची नावे पहा. म्हणजे हा सगळी गँग कशी एकाच सुरात सुर मिसळून काम करते ते सहजच लक्षात येईल. द क्विंट, द वायर, लाईव्ह लॉ वेबसाईट, कश्मिरवाला, सियासत दिल्ली, नॅशनल हेरॉल्ड (तोच तो कॉंग्रेसवाला पेपर ज्यावर कोर्ट केस चालू आहेत.) या सगळ्यांनी मिळून ही अमेरिकन बार असोसिएशन ची बातमी चालवली आहे.

मुळात अमेरिकन बार असोसिएशन च्या लेटर हेडवर जे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे त्याच्या शिर्षकापासूनच दिशाभूल करण्यात आली आहे. ‘प्रिलिमिनरी रिपोर्ट - द कंटिन्यू डिटेन्शन ऑफ स्टूडंटस् व्हॉलंटिअर सफुरा झरगर न्यू दिल्ली जून 2020). एक तर सफुरा ही कुठल्याही विद्यार्थी विषयक आंदोलनात काम करत असताना पकडल्या गेलेली नाही. विद्यार्थ्यांच्या हक्काची कुठलीच लढाई ती लढत नव्हती. सीएए, एनआरसी, एनपीआर हे विषय विद्यार्थी आंदोलनाचे नाहीत. शिवाय सफुरावर या आंदोलनात सहभागी आहे म्हणून गुन्हा नोंदवला गेला नाही. तर दिल्लीत जे दंगे भडकले त्यात भडकावू भाषणं करणे, महिलांना दंग्याच्या ठिकाणी आणून रस्ता रोको, मेट्रो स्टेशन बंद पाडणे, दगड चाकु दंडे यांचा वापर करून आंदोलन हिंसक करण्यासाठी प्रोत्साहन देणे असे गंभीर गुन्हे आहेत. शिवाय तिच्या भडकावू भाषणांचे व्हिडिओ आहेत.

सफुरावर युएपीए या गंभीर कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. जो की देशद्रोह्यांसाठी असतो. देशविरोधी उचापती केल्या म्हणून तीला अटक केल्या गेली आहे. आणि अशा गंभीर गुन्ह्यात अमेरिकन बार असोसिएशन पत्रक का काढत आहे? हे पत्रक बार असोसिएशनच्या मानवाधिकार समितीने तयार केले असा नमुद करण्यात आले आहे.

कॅपिटल टिव्हीच्या पत्रकारांनी या पत्रकाचा भांडाफोड केला आहे. त्यांनीच यातील बनाव उघडकीस आणला. हे पत्रक कुठल्या माहितीच्या आधाराने तयार करण्यात आले? ज्या पत्रकारांच्या लेखांचा आधार घेतला आहे त्यांची नावे या पत्रकात खाली तळटीपेत दिली आहेत. गीता पांडे (बीबीसी), अश्रफ जरगर (सीबीएस न्यूज), निहा मसी (वॉशिंग्टन पोस्ट), आकाश बिस्ट (अज जजिरा), सीमा पाशा (द वायर), अदनान भट (साउथ चॅनेल मॉर्निंग पोस्ट), गौतम भाटीया  (द स्क्रोल), जीवनप्रकाश शर्मा (आउटलूक इंडिया) ही नावे पाहिलीच की कळते की जमात ए पुरोगामींचा हा कसा कट आहे ते.

हा सगळा अहवाल तयार केल्यावर पत्रकाच्या खाली बारीक अक्षरात अशी तळटीप दिली आहे की हा अहवाल अमेरिकन बार असोसिएशनच्या नियामक मंडळाने हा अहवाल तपासलेला नाही. याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हा अहवाल अमेरिकन बार असोसिएशनची अधिकृत भूमिका म्हणून धोरण म्हणून गृहीत धरण्यात येवू नये.

डाव्यांचा बौद्धिक भ्रष्टाचार आम्ही म्हणतो तो हा आहे. हे पत्रक अधिकृत म्हणून ज्या ज्या न्यूज पोर्टलवर चालविण्यात आले त्यांनी बारीक अक्षरांतील या तळटीपेचा उल्लेख केला नाही. जाहिरातीत जसे मोठ मोठे दावे केले जातात आणि मग अगदी बारीक अशी एक चांदणी काढून खाली खुलासा केला असतो, ‘अटी लागू’ तसा हा प्रकार आहे. सर्रास खोटा प्रचार करायचा. सामान्य वाचकांनी दिशाभूल करायची. हे सगळे देशद्रोही म्हणजे कसे महान आहेत अशी प्रतिमा तयार करायची. त्यांच्यासाठी जोरात प्रचार चालवायचा. आणि बौद्धिकदृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या कुठे अडकायची वेळ येतच असेल तर अशी तळटीप देवून निसटण्याची फट ठेवायची.
अर्बन नक्षलीं असल्याचा संशय ज्याच्यावर आहे अशा ‘महान’ ‘विचारवंत’ लेखक असणार्‍यांची गेल्या 15-20 वर्षांतील महाराष्ट्रातील प्रतिमा कशी तयार करण्यात आली होती हे आठवून पहा. आता ते तुरूंगात जावून पडले आहेत, कायद्याचा फास त्यांच्या भोवती पक्का आवळला गेला आहे तेंव्हा मात्र त्यांच्या पाठीराख्यांची पाचावर धारण बसली आहे.

सफुराच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव आहे असा बनाव करण्यात आला आणि तो उघडा पडताच तातडीने ट्विट मागे घेतल जातात, लेख न्यूज पोर्टलवरून गायब होतात. पण आजकाल तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे हे सगळं साठवून ठेवण्याचे तंत्र विकसित झाले आहे. त्यामुळे असले खोटे ट्विट, मागे घेतलेले लेख जाणकार वाचकांच्या समोर येतात आणि या तथाकथित पुरोगाम्यांचे पितळ उघडे पडते.

(यु ट्यूबवरील कॅपिटल टिव्हीच्या व्हिडिओत ही सर्व माहिती  व अजूनही खुप माहिती देणारे व्हिडिओ आहेत. जरूर पहा. मी केवळ त्यातील थोडासा भाग मराठीत लिहून तूमच्यासमोर ठेवला आहे. हे जमात ए पुरोगामींचे षडयंत्र सगळ्या देशप्रेमींनी ओळखले पाहिजे व त्यांच्याकडून घडविण्यात येणार्‍या देशविरोधी कारवायांना आपल्या आपल्या परिने कडाडून विरोध केला पाहिजे. कॅपिटल टिव्ही, ऍपइंडिया, सत्य सनातन, ओएमएच न्यूज,  यांची ऍलर्जी असणार्‍या मित्रांना परत विनंती माझ्या लिखाणाच्या वाट्याला जावू नका. तूमचे आणि तूमच्या जमात-ए-पुरोगामी मित्रांचे मन:स्वास्थ्य बिघडले तर मी जबाबदार नाही.) 
   

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

4 comments:

  1. छान समाचार घेतला नकली फेक्युलरांचा ,,,
    पुरोगामी टोळकं बेनकाब झालं.

    ReplyDelete
  2. असे लेख व्हॉट्सअँप वर सर्व ग्रूपवर पाठविले तर संपूर्ण हिंदुस्तानी बांधवांना सावध होता येईल व त्यांची कारस्थाने उघडकीस येतील . हे लोक आतंकवाद्यांना वाचवायला कोणत्या थराला जातात हेही कळेल .आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय कारनामे उध्वस्त करण्यासाठी आपले लोक ही पुढे येतील .

    ReplyDelete
  3. असे लेख सर्वत्र पाठवून लोक जागृती करण्याचा प्रयत्न करणे हेच उद्देश
    त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या विरोधाला समोर जाण्यास तयारी आहेच . एवढी हिम्मत आहेच
    ते करणारच.धन्यवाद

    ReplyDelete
  4. whatsapp वर लेख पाठविण्यापेक्षा त्याची link पाठवा. माझ्या whatsapp नं.वर तूमचे नाव नं. पाठवा मी तूम्हाला link पाठवतो. कारण खुला मजकूर पाठवला तर त्यात बदल घडवले जातात. आणि क्वचित प्रसंगी कायदेशीर बाबींना तोंड द्यायची वेळ आली की पाठवणारा अडचणीत सापडू शकतो.

    ReplyDelete