उरूस, 7 सप्टेंबर 2021
उसंतवाणी- 163
(जावेद यांनी असं वाक्य वापरले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भारतीय तालीबानच आहे.)
संघ भारताचा । आहे तालिबान ।
फेके शब्दबाण । जावेद हा ॥
संघ नी विहिप । बजरंग दल ।
करीती दंगल । आरोप हा ॥
भारतात ऐसा । ‘डर का माहौल’ ।
पुरोगामी बोल । ऐकू येती ॥
14 पासुनिया । होत असे घोष ।
तरी कुणी देश । सोडेचिना ॥
विषारी गरळ । ओकतो ओवैसी ।
बाबरी द्या तैसी । पहिलीच ॥
तालिबांनी केली । सोपी सोय फार ।
यु.पी.चा प्रचार । केला सुरू ॥
कांत इस्लाम हा । टोळीबाज धर्म ।
लोकशाही मर्म । जाणिचेनी ॥
(5 सप्टेंबर 2021)
उसंतवाणी- 164
(संजय राउत यांनी असे वक्तव्य केले की ज्याचा मुख्यमंत्री त्याचे सरकार. म्हणजेच हे सरकार आघाडीचे नसून शिवसेनेचे आहे. कारण शिवसेना मोठा पक्ष आहे.)
ज्याचा मुख्यमंत्री । त्याचेच सर्कार ।
करीतो उच्चार । संजय हा ॥
आघाडीत मोठा । सेना मोठा पक्ष ।
मुख्यमंत्री दक्ष । घरातच ॥
काका नी सोनिया । पुढती वाक रे ।
सर्कार ठाकरे । स्वाभिमानी ॥
मुख्यमंत्री पद । देवोनी आवळा ।
काकांनी कोहळा । काढला हा ॥
पी.ए.चा बंगला । चालतो हातोडा ।
जीव थोडा थोडा । उद्धवाचा ॥
माथी झळकतो । आरोप ‘किरीट’ ।
मातोश्रीची वीट । थरथरे ॥
ज्या राजा पदरी । ‘संजय’ आंधळा ।
धन्य त्याची कळा । कांत म्हणे ॥
(6 सप्टेंबर 2021)
उसंतवाणी-165
(झारखंड विधानभवनाच्या परिसरांत एक दालन नमाज पढण्यासाठी उपलब्ध करून दिले गेले. यावरून मोठा गदारोळ उठल्या गेला आहे. सेक्युलर पुरोगामी यावरून कोंडीत सापडले आहे.)
नमाजाची खोली । विधानसभेत ।
सेक्युलर बेत । झारखंडी ॥
पंचनमाजी हे । तिथे आमदार ।
गैरसोय फार । होत असे ॥
काम सोडुनिया । जाती नमाजाला ।
अल्लाचा हवाला । देवोनिया ॥
मंदिर नी चर्च । नको गुरूद्वारा ।
अल्लाचा सहारा । सगळ्यांना ॥
झारखंड मध्ये । सेक्युलर फंडा ।
तावीज नी गंडा । बांधा जरा ॥
मशीदीत आता । संसद भरवा ।
रंग द्या हिरवा । चोहिकडे ॥
कांत झपाटता । सेक्युलर भुत ।
लोकशाही सुत । तुटू पाहे ॥
(7 सप्टेंबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575