उरूस, दैनिक पुण्य नगरी, बुधवार 30 ऑक्टोबर 2013
अपल्या हस्तीदंती मनोर्यात कवी-साहित्यीक-कलावंत बसून असतात असा आरोप नेहमी होतो. तो काही प्रमाणात खराही आहे. पण जेंव्हा सभोवतालची परिस्थिती अतिशय स्फोटक बनते, जगणेच अशक्य करून टाकते तेंव्हा काय करायचे? महान साहित्यीकाच्या घरासमोरचा रस्ता खराब झाला आणि त्याची बायका पोरे किंवा इतर कुटूंबिय त्यावर पडून जायबंदी झाले तर त्याचे पुरस्कार कामाला येणार आहेत का? भारतरत्न मिळालेल्या गायिकेच्या घरासमोर पावसाचे पाणी तुंबले आणि तिला घराबाहेर निघणे अशक्य झाले तर त्या भारतरत्नची नाव करून पाण्यावरून तरून जायचे का? पद्मश्री मिळालेल्या नटाच्या घराचा वीज पुरवठा 8 दिवस खंडित झाला. तर त्यानं काय प्रकाशाचा अभिनय करून अंधारावर मात करायची?
माझ्या घराकडे जाणारा रस्ता अतिशय खराब आहे. त्याबद्दल काय करता येईल याची आम्ही चर्चा करत होतो. अर्ज विनंत्या निवेदनं सर्व सर्व करून झालं. आणि सगळ्यात शेवटी काहीच होत नाही हे पाहून गुरूवारी (दि. 24 ऑक्टोबर 2013) रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी मी रस्त्यावरच उतरलो. माझी मोटार सायकल रस्त्याच्या मध्यभागी लावली, माझा मित्र जीवन कुलकर्णी याने आपले वाहन रस्त्यात लावले. बघता बघता लोक गोळा होत गेले. महाविद्यालयातील तरूण आणि शाळेतील मुलांचा उत्साह प्रचंड होता. त्या भागातील नगरसेवक तिथे आले पण त्यांनी काही ठोस आश्वासन देण्यास नकार दिला. आम्ही रस्त्याच्या दुरूस्तीसाठी लेखी आश्वासन मिळेपर्यंत बसून रहायचं ठरवलं. महानगर पालिकेच्या अभियंत्याने आम्हाला अकरा वाजता रस्ता दुरूस्तीचे लेखी आश्वासन दिले. आणि हे आंदोलन मिटले.
हे आंदोलन मिटले असे आम्हाला वाटले पण ते मिटले होते फक्त आमच्यापुरते. सामान्य नागरिकांचा रोष स्थानिक नेत्यांवरती होता. तसेच प्रशासकीय अधिकार्यांवरही होता. या शिवाय न हलणारी निगरगट्ट नोकरशाहीसुद्धा सामान्य माणसाने आवाज उठवला म्हणून अस्वस्थ झाली होती. त्यांनी कधी नव्हे तर काहीतरी कृती करायला सुरवात केली. पण हे सगळं जनक्षोभ वाढविणारे ठरेल याची त्यांना कल्पना नव्हती.
तब्बल चोविस तासांनी आमच्यावर पोलिस ठाण्यात बोलावून गुन्हे नोंदविण्यात आले. माझ्यासोबतच्या दोन मित्रांनी जामिन घेतला. त्यांची लागलीच सुटकाही झाली. मी जामिन नाकारला आणि ती नोकरशाही हादरली. कारण याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. सामान्य माणसापाशी असहकाराचे हत्यार असते. आणि ते त्याने वापरले तर काय करावे याचे उत्तर नोकरशाहीपाशी नसते.
मला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. तिथेही मी जामिन घेण्यास नकार दिला. न्यायधीश एक महिला होत्या म्हणूनही असेल कदाचित त्यांनी वैयक्तिक पातळीवर मला जामिन घेण्याची विनंती केली. पण मी ते नाकारले आणि तुरूंगात जाणे पसंद केले.
खरं तर या व्यवस्थेने हे माझ्यावर लादले होते. मी एका खड्ड्यासाठी छोटेसे माझ्यापुरते आंदोलन केले. ते बघता बघता मला तुरूंगात घेवून गेले. एक कवी साहित्यीक आंदोलन का करतो तर त्याला तसे करण्यास व्यवस्था भाग पाडते.
तुरूंगातला माझा अनुभव मोठा मजेशीर होता. सामान्य कैद्यांना कळेना हा वेगळा दिसणारा व्यवस्थीत दाढी केलेला बर्यापैकी कपड्यातला माणूस तुरूंगात का आला. एका कैद्याची प्रतिक्रिया तर मोठी बोलकी आणि आपल्या व्यवस्थेवर ताशेरे उडविणारी होती. तो सरळ म्हणाला, ‘‘साहेब कोणत्या डिपार्टमेंटमधले तूम्ही? करप्शन मध्ये आला असाल.’’ त्याला जेंव्हा मी माझी सर्व माहिती सांगितली आणि तुरूंगात येण्याचे कारण सांगितले तेंव्हा ते सगळे कैदी आश्चर्य करीत राहिले. जामिन नाकारून कोणी तुरूंगात कसे काय राहू शकतो? हेच त्यांना कळेना.
माझ्यासोबत महाभारताचे पुस्तक होते. ते मी रात्री वाचायला सुरवात केली. सोबतचा दुसरा कैदी पत्नीचा खुन करून आलेला होता. त्याला दुसरा एक हात पाय तोडण्याच्या गुन्ह्यातील कैद्याने बोलावले आणि म्हणाला, ‘‘देख बे हरामी. तू औरत की वजह से अंदर आया. ये बॉस पढ रहे वो महाभारत भी औरत की वजहसेही हुआ है.’’
पहाटे सुर्याची किरणे बराकीत आली तेंव्हा ती बराक असूनही छान वाटले. बाकी जो काही रात्रभर त्रास झाला ते जावू द्या. जेवणाचे जे हाल झाले ते काय सांगणार. बराकीचा एक भाग प्रस्थापित कैद्यांचा होता. त्यातील एकाकडे सगळी वर्तमानपत्रे येत होती. त्याने इंग्रजी दैनिकातील माझी बातमी वाचली. मला खुणेनं स्वत: जवळ बोलावून घेतलं. मराठी वृत्तपत्रांतील माझी छायाचित्रे आणि मोठ मोठ्या बातम्या वाचल्या. मला तो गांभिर्याने म्हणाला, ‘‘साहेब तूम्ही रहाच इथे जास्त दिवस. बाहेरच्या गोष्टीसाठी तूम्ही आंदोलन करता आता जरा इथल्या समस्यांसाठीही करा. हे पोलिस फार ***** (ही पाच अक्षरी शिवी मी सांगायची गरज नाही सगळ्यांना माहित आहे) आहेत.’’
जो कैदी हात पाय तोडून आत आला होता तो दलित होता आणि त्याची बायको सवर्ण होती. यामुळे त्याच्याशी भांडण समोरच्याने काढले होते. याने कंटाळून त्याच्यावर हल्ला केला आणि आत आला. आता काय करावे याचा सल्ला तो मला मागत होता. वास्तविक त्याचा भाऊ नगरसेवक होता. मोठ मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी त्याचे जवळीकीचे संबंध होते. पण ही सगळी व्यवस्था आपल्याला काहीच न्याय देवू शकत नाही. एक साधा प्रामाणिक माणूस आपल्याला खरं खरं काही तरी सांगू शकेल असे त्याला वाटले.
चोरीची गाडी खरेदी प्रकरणी एक तरूण पोरगा घरचा एकूलता एक उगाच आतमध्ये आला होता. त्याने माझे ताट मला धुवू दिले नाही. नियमित जेलची वारी करणार्या एका कैद्याने माझ्यासाठी जास्तीचं दुध, केळं राखून ठेवली. मला तुरूंगातले जेवण जाणार नाही याची त्याला कल्पना होती.
तर भिंतीच कोसळत चालल्या आहेत
हवेत विष भिनून
श्वासांपर्यंत येवून पोंचले आहे
स्फोटाचे परिणाम पोंचत आहेत
गर्भातल्या बाळापर्यंत
आता कुठल्या आवरणाखाली जपून ठेवावा
माणूसकीचा कोवळा कोंब
आता रस्त्यावर यावंच लागेल
एखाद्या ओंडक्यामागे
सगळी शक्ती एकवटून
माराव्या लागतील धडका
बंद दरवाज्यावर
मला कल्पना नव्हती की माझी कविता माझ्या मेंदूतून माझ्या हातापायात उतरेल. मी खरंचच रस्त्यावर उभा राहीन. बघता बघता लोकं जमा होतील. माझ्यामागे जनशक्ती उभी राहून मला व्यवस्थेला धडक मारण्याचे बळ येईन.
आता साहित्यीकालाच नाही तर सगळ्यांना रस्त्यावर उतरून व्यवस्थेला धडक मारण्याची गरज निर्माण झाली आहे.
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

एक साधा माणूस आपल्या हक्कासांठी आग्रह धरतो आणि व्यवस्था हादरते. त्यातही तो कवी साहित्यीक असेल तर त्याला याचे विविध पैलू चटकन लक्षात येतात. आणि त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे कवी-साहित्यीक-कलावंत यांच्याभोवतही असलेले अलिप्ततेचे आवरण गळून पडते. वास्तवाची हवा त्याला स्पर्शते आणि त्याच्यातील कलाकारालाच हादरून सोडते. त्याच्या जगण्याची मुळं सुस्त-सुखवस्तू मातीतून ती उपटून तपासते. तेंव्हा त्याचे डोळे उघडतात. मी 25 वर्षांपूर्वी एक कविता लिहीली होती
बंद करून घ्याव्यात दारं खिडक्यातर भिंतीच कोसळत चालल्या आहेत