दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 25 फेब्रुवारी 2014
एका खेड्यात तिशीच्या आतबाहेरचे काही तरुण गोळा होतात. त्यांना वाटते की आपल्या हातात कांद्याचे किंवा इतर पिकांचे जे थोडेफार रोख पैसे आले आहेत त्यातून व्यावहारिक बाबींशिवाय अजून काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. सप्ते तर कुणीही घालतं. आपल्या गावासाठी आपल्याला वेगळं असं काय करता येईल? मग वाचनालयाची कल्पना पुढे येते. साने गुरूजींच्या नावानं एक वाचनालय सुरू करण्यात येतं. त्यासाठी जागा कोण देणार? एक पडकी जागा मिळते. मग हे तरुण स्वत: तिथे बांधकाम करतात आणि वाचनालय सुरू होतं. ही काही कोण्या चित्रपटाची कथा नाही. नाशिक जिल्ह्यातील, पैठणीसाठी आणि छगन भुजबळांसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक गावाची ही कथा आहे.
या गावातील साने गुरुजी वाचनालयाने नुकतेच नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अधिवेशन घेतले. ज्या गावाची लोकसंख्याच जिथे जेमतेम दोन हजार आहे तिथे तीन हजार लोक ग्रंथालय संघाच्या अधिवेशनासाठी जमा होतात हा एक खरंच चमत्कार होता.
सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यात सांप्रदायिक पद्धतीनं वारकरी मंडळी अभंग गात होती. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा अभंग आळवत असताना माझ्या मनात मात्र वेगळेच शब्द उमटत होते. मला वाटत होते की हे वारकरी गात आहेत ते शब्द ‘सुंदर ते ध्यान । बैसे खुर्चीवरी । ग्रंथ हातावरी । घेवुनिया ॥ असे आहेत की काय. दिंडीत सहभागी शाळकरी मुलांचा उत्साह कमालीचा दांडगा होता. एरवी असे वाटू शकते की ही ग्रंथ दिंडी मुलांना सक्तीची केल्यामुळे मुलं आली असतील. मी मुलांना विचारले तेव्हा कळलं की ही सगळी मुलं स्वेच्छेनं आणि पुस्तकांवरच्या प्रेमापोटी आपणहून दिंडीत सहभागी झाली होती. गावातील आया बायांनी आपापल्या घरासमोर शेणाचा सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. एखाद्या सणासाठी तयार करावं तसं आया आपल्या लेकरांना न्हाऊ माखू घालून तयार करत होत्या. माणसे गावातून बाहेर निघून गेलेली, शेतावर राहायला गेलेली, शहरात परागंदा झालेली. त्यामुळे गावातील घरे रिकामी, त्यांना कुलूपं, वाडे पडलेले. पण आज उत्साहानं शक्य होईल ती घरं उघडली गेली होती. साफसफाई झाली होती. कारण काय तर वाचनाचा उत्सव लोकांना साजरा करायचा होता.
ग्रंथालय संघाच्या या अधिवेशनात विविध सत्कार करण्यात आले, त्यात दोन सत्कार मोठे विलक्षण होते. प्रदीप पाटील या ग्रंथपालाचा सत्कार करण्यात आला. या मुलाने साने गुरुजी वाचनालयाची धुरा तर सांभाळली आहेच. पण संपूर्ण महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या ग्रंथपालन परीक्षेत याला पहिला क्रमांक मिळाला. सर्वांच्याच चेहर्यावर या तरुण मुलासाठी कौतुक झळकत होते. दुसरा सत्कार होता दिंडोरीच्या ऐंशी वर्षे वयाच्या वृद्ध रतनबाई पारिख यांचा. वयाच्या 14 व्या वर्षीच वैधव्य प्राप्त झालेल्या या बालविधवेने उर्वरित आयुष्यात पुस्तकांशीच संसार मांडला आणि त्या अर्थाने तो यशस्वी करून दाखवला. या महिलेला मंचावर चढणेच शक्य नव्हते. मग पाहुण्यांनीच खाली उतरून त्यांचा सत्कार केला.
महाराष्ट्रातील ग्रंथालयाची चळवळ ही तळमळीच्या कार्यकर्त्यांनी वाढविली/जोपासली आहे. ज्यावेळी अनुदानही मिळत नसायचं अशावेळी गावोगावी निष्ठावान लोकांनी पदरमोड करून या संस्था स्थापन केल्या. मधल्या काळात सर्वांना असे वाटत होते की आता वाचनाचे काही खरे नाही. लोकांना मुळीच वाचायचे नाही. पण चिचोंडीसारख्या गावानं वाचनाचे महत्त्व ओळखले आणि वाचन संस्कृतीच्या विकासासाठी तरुण पिढी सज्ज आहे हेही सिद्ध करून दाखवले.
येवल्याला एक संपन्न साहित्यिक वातावरण आहे. गो.तु.पाटील यांच्या सारख्यांनी हे वातावरण जपलं आहे. अनुष्टुभ सारखं नियतकालिक इथून निघतं हे एक मोठं योगदान मराठी वाङ्मयविश्वात आहे. भाऊसाहेब गमेंसारखे तरुण कार्यकर्ते आता ‘अनुष्टुभची’ धुरा सांभाळत आहेत. आमच्या शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष कै. मोहन गुंजाळ यांच्यामुळे माझा येवल्याशी पहिला संबंध आला. अर्जुन कोकाटेंसारखे ज्येष्ठ पत्रकार,बाबासाहेब शिंदे, गोरख खराटे, शिवाजी निमसे सारखे तरुण धडपडत आहेत म्हणून या संस्था बाळसे धरत आहेत. प्रमोद पाटीलसारख्या तरुण पत्रकाराने पुढाकार घेऊन हे अधिवेशन आणि एकूणच सांस्कृतिक वातावरण जोपासण्याचे मोठे काम या परिसरात केले आहे.
ग्रंथालय संघाच्या कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्या मोठ्या तळमळीनं या अधिवेशनात मांडल्या. ‘गाव तेथे ग्रंथालय’ अशी घोषणा महाराष्ट्र शासनाने केली होती. आज महाराष्ट्राच्या स्थापनेला पन्नास वर्षे उलटून गेली आहेत. पुरोगामी म्हणविल्या गेलेल्या महाराष्ट्रात चाळीस हजार खेड्यांपैकी जेमतेम दहा हजार खेड्यातच वाचनालयं स्थापन करता आली आहेत. जी वाचनायं चालू आहेत त्यांच्या पायातही विविध नियमांच्या बेड्या अडकवून त्यांना काम करणं अशक्य करून टाकलं आहे. अनुदानाची बोंब आहे. इकडे शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणायचं आणि जिथे बहुजन समाज मोठ्या संख्येनं राहतो त्या खेड्यापाड्यांतून वाचन संस्कृतीची पूर्ण राखरांगोळी करायची असंच धोरण या महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या पोटी जन्मलेल्या राज्यकर्त्यांनी अवलंबले आहे असं दिसतं आहे.
चिचोंडीसारख्या दोन हजार वस्तीच्या गावानं वाचनसंस्कृतीसाठी जी धडपड केली त्याची यथार्थता लहान पोरांच्या डोळ्यात दिसत होती. इंद्रजित भालेराव यांचा ग्रंथावरचा अभंग मंडपात उच्चारताच लहान मुलांनी
हात जोडले. तो अभंग असा होता
ग्रंथ माझे गुरू । ग्रंथ मायबाप
निवविती ताप । हृदयाचे ॥
ग्रंथ माझे सखे। जीवन सांगाती ।
आयुष्या ये गती । ग्रंथामुळे ॥
ज्ञानेश तुकोबा । फुले बाबासाब ।
ग्रंथातून आज । भेट देती ॥
ग्रंथांनी ठेविली । संस्कृती जिवंत ।
म्हणुनीच ग्रंथ । नित्य घ्यावे ॥
ग्रंथ खरिदावे । ग्रंथ उरी घ्यावे ।
ग्रंथ भेट द्यावे । वेळोवेळी ॥
घरात असावे । ग्रंथांचे कपाट ।
देवा जसा पाट । देव्हार्यात ॥
ग्रंथ ज्याचा जीव । ग्रंथ ज्याचा श्वास ।
त्याच्या आसपास । देव राहे ॥
चिचोंडीहून येताना रस्त्यात कोटमगावला देवीचे दर्शन घेतले पण देवत्वाचा भास मला चिचोंडीच्या परिसरातच लहान मुलांच्या आणि तरुणांच्या सहवासात झाला.
येवला येथे नामदार छगन भुजबळ यांचे कार्यालय असलेल्या विंचुर रोडपासून डावीकडे वळले की चिचोंडीला जाणारी वाट सापडते आणि खरंच भुजबळ साहेबांचा रस्ता सोडून दुसरीकडे वळल्याशिवाय वाचन संस्कृती जोपासणारे चिचोंडीसारखे गाव सापडणारही नाही.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

>>एका खेड्यात तिशीच्या आतबाहेरचे काही तरुण गोळा होतात. त्यांना वाटते की आपल्या हातात कांद्याचे किंवा इतर पिकांचे जे थोडेफार रोख पैसे आले आहेत त्यातून व्यावहारिक बाबींशिवाय अजून काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. सप्ते तर कुणीही घालतं. आपल्या गावासाठी आपल्याला वेगळं असं काय करता येईल? मग वाचनालयाची कल्पना पुढे येते.
ReplyDeleteवा!
"या गावात वाचनालयामुळे पडलेला फरक" यावर कुणीतरी अभ्यासप्रकल्प केला पाहिजे.
या गावात वाचनामुळे फरक पडला आसे मी म्हणत नाही. तसे घडायला वेळ लागेल. फक्त सुरवात झाली याचे मला फार महत्व वाटते. आशी सुरवात इतर ठिकाणी झाली पाहिजे.
ReplyDeleteसुरूवात होणंही महत्त्वाचं आहेच.
Deleteगावात वाचनालय असणं हे किती छान आहे!
पण वाचनालयांनी काही फरक पडणार नसेल तर सप्ते काय नि वाचनमहोत्सव काय? सगळाच नुसता उत्साह!, असं नको व्हायला.
गावात नसेल फरक पडला पण वाचकांमधे, मुलांमधे पडला आहे का?
चार म्हणजे शब्दश: चार मुलांना जरी वाचनाची गोडी लागली तरी एवढे यश रग्गड!
आणि अभ्यास तर व्हायला हवाच आहे, फरक पडला नसेल, तर का नाही पडला?
कुठल्या सुधारणा करायला हव्यात.
वाचनालय सुरू करण्यामागची उद्दिष्टं कुठली होती? ती सफल झाली का?
कुठली उद्दिष्टे असायला हवीत?
वाचनालयात कुठली पुस्तके असावीत?
वाचनालय सुरू करून आपण बायकांना पाककृतींची आणि पुरूषांना ’घरच्या घरी दुरूस्त्या’ वाली पुस्तके पुरवायची का?
अशी छोटी छोटी कामे करतानाही त्यामागे एक व्यापक दृष्टीकोन एक भूमिका असायला हवी.
( तशी त्यांची असेलही.)
अशी वाचनालयांची सुरूवात इतर ठिकाणीही व्हायला हवी असेल तर त्यांच्या समोर असा एक अभ्यास असेल तर किती बरं पडेल.