Monday, December 20, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८९

उरूस, 18 डिसेंबर 2021 




(स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वौच्च न्यायालयाने निकाली लावला. त्यावरून आता राजकारण रंगू लागले आहे. या जागा आता खुल्या प्रवर्गात घेवून तेथे निवडणुक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. )



(किराणा दुकानात वाईन विक्रीस ठेवता येईल अशी चर्चा सरकारी पातळीवर चालू आहे.)



(बांग्लादेश निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाली. हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करण्यात आला. कॉंग्रेसने उत्तराखंड मध्ये प्रचार रॅलीत सेनापती बिपीन रावत यांचे कटआउट वापरले. त्यावरून वाद उसळला.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, December 15, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८८

 
उरूस, 15 डिसेंबर 2021 



(राहुल गांधी यांनी हिंदू-हिंदुत्व अशी भाषा करून आपल्या सुमार बुद्धीचे प्रदर्शन सुरू केले आहे. ओवैसी यांनी आता भाजप मोदी सोडून कॉंग्रेसलाच निशाणा बनवित टीका सुरू केली आहे. )



(काशी विश्वनाथ कॉरिडोर चे लोकार्पण मोदींनी 13 डिसेंबरला केले.)




(विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणुक झाली. सहा पैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यात 2 भाजप, 1 सेना व 1 कॉंग्रेस असे बलाबल होते. विदर्भातील ज्या दोन जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली त्यात नागपूर विभागांतून भाजपचे बावनकुळे तर अकोल्यांतून खंडेलवाल असे दोन उमेदवार निवडून आले. म्हणजे भाजपच्या 6 पैकी 4 जागा निवडून आल्या.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Monday, December 13, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८७

 
उरूस, 12 डिसेंबर 2021 




(भारताचे सरसेनापती (सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांना विनम्र श्रद्धांजली. )




(संयुक्त किसान मोर्चाने राकेश टिकैत यांना बेदखल करायला सुरवात केली. डावे समाजवादी यांनी हे आंदोलन पूर्णत: हायजॅक केले असून त्यातून टिकैत यांच्या उत्तर प्रदेशांतील किसान युनियनला बाजूला करण्यात येत आहे. )





(महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी न्यायालयात बीनशर्त माफी मागत आपली चुक कबुल केली आहे. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. धर्मविषयक खोटी माहिती देवून मलिक यांनी आमच्या कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी केला होता. )

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, December 10, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८६

 उरूस, 9 डिसेंबर 2021 




(सहा डिसेंबर हा दिवस बाबरीचे पतन आणि बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण या दोन घटनांसाठी लक्षात ठेवला जातो. दलित मुस्लीम यांचा वापर सातत्याने व्होट बँक राजकारणासाठी केला गेला. त्यांच्या सार्वांगिण विकासाकडे कधीच लक्ष दिले गेले नाही. आधुनिक काळात सेवा व्यवसायाला महत्त्व आले आणि परंपरेने सेवा व्यवसायात असलेला हा वर्ग मात्र त्या लाभांपासूनही वंचितच राहिला किंवा ठेवला गेला. )





(ममता दिदींनी युपीए नो मोर म्हणताच शिवसेनेने त्याचे समर्थन केले. शरद पवारांना युपीए चे प्रमुख करा अशी मागणीही आधीच संजय राउतांनी केली होती. पण कॉंग्रेसकडून दबाव येताच त्यांनी कोलांटउडी मारली. कॉंग्रेस शिवाय भाजप विरोधी आघाडी शक्य नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. सामनात अग्रलेख लिहिला. राहूल गांधींची दिल्लीत जावून भेट घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.)




(शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी जितेंद्र नारायण त्यागी असे नाव धारण करत हिंदू धर्म स्विकारला. त्यांच्या भाषेत त्यांनी घरवापसी केली. यावरून एक मोठा गदारोळ कट्टरपंथी इस्लामींमध्ये सुरू झाला.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, December 6, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास भाग ८५

 
उरूस, 6 डिसेंबर 2021 



(हिवाळ्यात पाऊस पडल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. अभाळाखालची शेती आता मुश्कील होवून बसली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय आता पर्याय उरला नाही.)



(नाशिकच्या साहित्य संमेलनात अंधेरा छाया है अशी भाषा गीतकार जावेद अख्तर यांनी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असा गळा काढणारे हे सारे मोकळेपणाने गेली साडेसात वर्षे बोलत आहेत. पण भाषा मात्र बोलू दिले जात नाही अशीच आहे.)





(लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडने शाई फेकली. त्यांच्या पुस्तकांतील संभाजी महाराजांच्या बदनामी बद्दल ही शिक्षा देण्यात आल्याचे ब्रिगेडींचे म्हणणे आहे. हे तेच कुबेर आहेत ज्यांनी मदर टेरेसा यांच्यावरचा अग्रलेख मालकाच्या दबावात मागे घेतला होता.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, December 3, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास भाग ८४

 ३ डिसेंबर २०२१ 


उसंतवाणी २५० 

कृषी कायदे मागे घेतले तरी कृषी आंदोलन चालूच ठेवण्यावर टिकैत सारखे नेते अडून बसले आहेत. त्यातून त्यांचे इरादे स्पष्ट होत आहेत. ज्याचा प्रत्यक्ष शेतीशी काहीच संबंध नाही. 


उसंतवाणी २५१ 

राज्य सभेच्या १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले. हे विरोधी खासदार राज्य सभेत गोंधळ करत होते. या पूर्वीच्या सत्रात त्यांनी गोंधळ घातला म्हणून ही शिक्षा त्यांना आताच्या सत्रात दिल्या गेली. 


उसंतवाणी २५२ 

ममता ब्यानर्जी यांनी मुंबई मध्ये असे वक़्तव्य केले की "यूपीए नो मोर!'' आता ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की सोनिया यांचे नेतृत्व त्या मान्य करत नाहीत. आणि तसेही कॉंग्रेस संपल्या शिवाय ह्या पक्षांचा जनाधार वाढू शकत नाही. सर्वच विरोधक कॉंग्रेस  प्रश्नावर विखुरले आहेत. 

श्रीकांत उमरीकर, ९४२२८७८५७५. 





Tuesday, November 30, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८३


उरूस, 30 नोव्हेंबर  2021 



उसंतवाणी- 247

(साम टिव्हीने केलेल्या सर्वेक्षणात मविआ सरकारच परत सत्तेवर येईल असा निष्कर्ष काढण्यात आला. सत्ताधारी आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सर्वात लोकप्रिय असल्याचेही संागण्यात आले.)





उसंतवाणी- 248

(संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधकांची एकी या वेळी दिसणे आवश्यक होते. पण सोनिया गांधींनी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला ममता बॅनर्जी यांनी जाण्याचे नाकारले. मायावतींनी अंतर ठेवले. केजरीवाल यांनीही नकार दिला. विरोधी बाकावर अशी फाटाफुट सुरवातीलाच दिसून आली.)



उसंतवाणी-249

(संज राउत आणि सुप्रिया सुळे यांनी संजय राउत यांच्या मुलीच्या लग्नात नृत्य केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर एक चर्चा सुरू झाली आहे. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575