३ डिसेंबर २०२१
उसंतवाणी २५०
कृषी कायदे मागे घेतले तरी कृषी आंदोलन चालूच ठेवण्यावर टिकैत सारखे नेते अडून बसले आहेत. त्यातून त्यांचे इरादे स्पष्ट होत आहेत. ज्याचा प्रत्यक्ष शेतीशी काहीच संबंध नाही.
उसंतवाणी २५१
राज्य सभेच्या १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले. हे विरोधी खासदार राज्य सभेत गोंधळ करत होते. या पूर्वीच्या सत्रात त्यांनी गोंधळ घातला म्हणून ही शिक्षा त्यांना आताच्या सत्रात दिल्या गेली.
उसंतवाणी २५२
ममता ब्यानर्जी यांनी मुंबई मध्ये असे वक़्तव्य केले की "यूपीए नो मोर!'' आता ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की सोनिया यांचे नेतृत्व त्या मान्य करत नाहीत. आणि तसेही कॉंग्रेस संपल्या शिवाय ह्या पक्षांचा जनाधार वाढू शकत नाही. सर्वच विरोधक कॉंग्रेस प्रश्नावर विखुरले आहेत.
श्रीकांत उमरीकर, ९४२२८७८५७५.
No comments:
Post a Comment