Friday, December 10, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८६

 उरूस, 9 डिसेंबर 2021 




(सहा डिसेंबर हा दिवस बाबरीचे पतन आणि बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण या दोन घटनांसाठी लक्षात ठेवला जातो. दलित मुस्लीम यांचा वापर सातत्याने व्होट बँक राजकारणासाठी केला गेला. त्यांच्या सार्वांगिण विकासाकडे कधीच लक्ष दिले गेले नाही. आधुनिक काळात सेवा व्यवसायाला महत्त्व आले आणि परंपरेने सेवा व्यवसायात असलेला हा वर्ग मात्र त्या लाभांपासूनही वंचितच राहिला किंवा ठेवला गेला. )





(ममता दिदींनी युपीए नो मोर म्हणताच शिवसेनेने त्याचे समर्थन केले. शरद पवारांना युपीए चे प्रमुख करा अशी मागणीही आधीच संजय राउतांनी केली होती. पण कॉंग्रेसकडून दबाव येताच त्यांनी कोलांटउडी मारली. कॉंग्रेस शिवाय भाजप विरोधी आघाडी शक्य नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. सामनात अग्रलेख लिहिला. राहूल गांधींची दिल्लीत जावून भेट घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.)




(शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी जितेंद्र नारायण त्यागी असे नाव धारण करत हिंदू धर्म स्विकारला. त्यांच्या भाषेत त्यांनी घरवापसी केली. यावरून एक मोठा गदारोळ कट्टरपंथी इस्लामींमध्ये सुरू झाला.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment