उरूस, 27 नोव्हेंबर 2021
उसंतवाणी- 244
(उत्तर प्रदेशांत कोणाची कोणाशी युती होणार यावर मोठा गदारोळ उठला आहे. भाजप विरोधी मतांत फुट पडू नये म्हणून एकीकडे सर्व पुरोगामी पत्रकार विचारवंत घसा कोरडा करत आहेत आणि प्रत्यक्ष विरोधी पक्षातले मतभेद संपायला तयार नाहीत. त्यांची आपसांतील फाटाफुट सातत्याने दिसून येत आहे.)
वाढवितो प्रश्न । प्रदेश उत्तर ।
होई निरूत्तर । विश्लेषक ॥
युतीसाठी जाई । कोण कोणा संग ।
उडती पतंग । अंदाजांचे ॥
जाती धर्म पक्की । म्हणे व्होट बँक ।
सत्तालोभे टँक । भरलेला ॥
आता नाही जोडी । ‘बुआ’ नी ‘बबुआ’।
‘फायदा न हुआ’ । गतवेळी ॥
बिछडले दोघे । ‘युपी के लडके’ ।
दोघेही कडके । सत्ताहीन ॥
हळू हळू होऊ । लागली खातरी ।
हिरवी कातरी । ओवैसी हा ॥
कांत मोदी योगी । डबल इंजन ।
विखुरले जन । विरोधक ॥
(25 नोव्हेंबर 2021)
उसंतवाणी- 245
(सेंट्रल विस्टाच्या विरोधात परत एक याचिका सर्वौच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सहाव्यांदा ही याचिका फेटाळण्यात आली. )
(26 नोव्हेंबर 2021)
उसंतवाणी-246
(26 नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्यात आला. त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. संसदेने केलेले कायदे रस्त्यावरच्या झुंडशाही आंदोलनाने मागे घेण्यात आले. हा संविधानाचा मोठा अपमान आहे. )
(27 नोव्हेंबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575