अभंग पुस्तकालयाच्या वतीने गेल्यावर्षीपासून ‘वाचकनिशी’ असा अभिनव उपक्रम राबविला जातो. यावर्षी ही वाचकनिशी चित्रपट या विषयाला वाहिलेली आहे. यात 104 राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय चित्रपट आणि 52 हिंदीचित्रपट गीते यांची माहिती दिली आहे. 104 चित्रपटांची निवड, त्यांच्यावर टिपणे लिहीणे ही जबाबदारी गणेश मतकरी यांनी उचलली आहे. त्यांचा अधिकार मोठाच आहे. नुकत्याच आलेल्या मौज दिवाळी अंकात त्यांनी भारतीय सिनेमावर एक चांगला परिसंवाद घेवून महत्त्वाचे लिखाण केले व इतरांकडून करवून घेतले आहे. मला स्वत:ला आंतरराष्ट्रीय चित्रपटाबद्दल फारसे ज्ञान नाही शिवाय बहुतांश चित्रपट पहाण्यातही आले नाहीत परिणामी त्याबद्दल कुठलीच टिपणी मी करू शकत नाही.
पण या वाचकनिशीतील 52 गाण्यांबाबत मात्र तिव्र असमाधान जाणवले. हिंदी चित्रपट गीतांचे साधारणत: चार टप्पे पडतात. पार्श्वगायना विकास होण्यापूर्वीचा 1949 पर्यंतचा पहिला टप्पा. 1949 ते 1965 हा हिंदी गाण्यांचे सुवर्णयुग असलेला दुसरा टप्पा. 1966 ते 1987 पर्यंतचा तिसरा टप्पा यातील गाणी सुमार आहेत. 1988 च्या कयामत से कयामत पासून 2003 पर्यंतचा चौथा टप्पा. पाचवा टप्पा ज्याची जडण घडण अजून चालू आहे. यावरचे आक्षेप असे
1. या वाचकनिशीत पहिल्या टप्प्यातील दोनच गाणी निवडली आहेत. सैगलचे गाणे असणे अपरिहार्यच आहे आणि ते आहेही. पण सोबतच गायक अभिनेत्री म्हणून गाजलेल्या नुरजहा व सुरैय्या यांचे किमान एक एक तरी गाणे हवे होते. त्याऐवजी केवळ एकाच चित्रपटामूळे गाजलेल्या जेमतेम एकाच गाण्याची धनी असलेल्या उमादेवी (टूनटून) यांचे ‘अफसाना लिख रही हू’ हे गाणे घेतले आहे. त्याचे औचित्य काय?
2. दुसर्या टप्प्यातील गाणी 32 आहेत आणि ते बरोबरही आहे कारण हाच संगीताचा सुवर्णकाळ होय. पण पार्श्वगायिका म्हणून पहिल्यांदा जिला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली त्या शमशाद बेगमचे एकही गाणे न घेण्याचे काय कारण? तूलनेने अतिशय थोडी गाणी गायलेल्या मुबारक बेगम यांचे हमारी याद आयेगी हे गाणे घेतले आहे. याच काळात सुमन कल्याणपूर, महेंद्र कपुर यांची छोटी पण महत्त्वाची कामगिरी आहे. त्यांचे एकही गाणे कसे नाही?
3. तिसर्या टप्प्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि लोकप्रिय संगीतकार म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल. हिंदी चित्रपट सृष्टीत सगळ्यात जास्त काळ टिकलेली, सगळ्यात जास्त चित्रपटांना संगीतबद्ध केलेली अशी ही जोडी. त्यांचे एकही गाणे यात नसू नये याला काय म्हणायचे. याच काळात शैलेंद्रसिंग, येसूदास यांनी आपली छोटी कारकीर्द गाजवली. अतिशय थोड्या चित्रपटात गायन केलेल्या गझल गायक जगजित सिंग यांचे गाणे घेतले पण वरील दोघांची गाणी का नाही घेतला आली?
4. 1988 ते 2007 इतक्या मोठ्या काळात हिंदी चित्रपट संगीतात मोठे परिवर्तन झाले. 1998 मध्ये कयामत से कयामत मधून आनंद मिलींद, आशिकी मधून नदीम श्रवण आणि रोझा मधून ए.आर. रेहमान यांनी हिंदी गाण्यांचा बाज पूर्णपणे बदलून टाकला. परत एकदा माधुर्य हा हिंदी गाण्यांचा स्थायी भाव बनला. याची काहीसुद्धा खबर संपादकांना नाही का? या काळातील एकही गाणे घेण्याचे सुचले नाही. मग या काळातील अलका याज्ञिक, साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, उदीत नारायण, कुमार सानू, सोनू निगम, अभिजीत अशा गायकांबद्दल बोलायचे काही कामच ठेवले नाही.
5. कोहीनूर, कागज के फुल या चित्रपटांतील दोन दोन गाणी निवडली आहेत पण कित्येक चांगले महत्त्वाचे चित्रपट यातून सुटले आहे. लताचे योगदान मोठेच आहे म्हणून तिची 17 गाणी समजू शकतो पण गीताची मात्र दोन गाणी निवडली आहेत. आशा भोसलेची चारच गाणी आहेत. रफीची 13 आणि 70 नंतर महत्त्वाचा आवाज असलेल्या किशोरची मात्र 6 च गाणी. हे काय गौडबंगाल आहे? नौशाद, सचिनदेव बर्मन, शंकर-जयकिशन यांची सहा सहा गाणी निवडताना सी.रामचंद्र आणि ओ.पी.नय्यर यांची दोन दोनच गाणी निवडून का अन्याय केला?
गाण्याची निवड करण्यात मर्यादा पडतात हे खरे आहे. पण सर्वसमावेशक करण्याचा निदान प्रयत्न केला असता तर हेतू शुद्ध आहे हे तरी सिद्ध झाले असते. अनेक अवीट गोडीची द्वंद्वगीते आसताना यात केवळ ७च निवडली आहेत. ही निवड निव्वळ सुमार पद्धतीने आणि कुठलाही विचार न करता सरधोपटपणे केली आहे. यात कुठलेही सुत्र नाही. काळाप्रमाणे क्रम लावलेला नाही. संगीताचा विकास किंवा अधोगती असा काही विचार झाला नाही. गीतकारांची प्रतिभा विचारात घेतलेली नाही.
अनकही चित्रपटांतील भिमसेन जोशी यांनी गायलेली तुलसीदासांची रचना घेतली आहे. पण चित्रपटाचे व संगीतकाराचे नाव चुक पडले आहे. गाण्यावरील लेखात उल्लेख बरोबर आहे. ही कदाचित तांत्रिक चुक असावी. संपादकीयात चित्रपटांबद्दल लिहीले आहे पण गाण्याबद्दल गाण्याच्या निवडीबद्दल काहीच लिहीले नाही. लोकप्रिय चित्रपटांचा यात समावेश नाही असे म्हणताना मोगल-ए-आझम चे नाव आहे. आणि प्रत्यक्षात मोगल ए आझम ची माहिती आतमध्ये आहे. अशा काही बेफिकीरीमुळे झालेल्या चुकाही यात आहेत.
गायक आणि संगीतकार यांच्यावर आता बर्यापैकी अभ्यास करून कित्येक जणांनी मांडणी केली आहे. मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजीमध्ये हे सगळे सविस्तरपणे आले आहे. असे असताना एक सुमार निवड लोकांच्या माथी मारून काय मिळवले? मागच्या वर्षी याच वाचकनिशीवर टिका केली तेंव्हा पुढच्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करून काढूत असे आश्वासन संपादक-प्रकाशकांनी दिले होते. या वर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रटांच्या आघाडीवर दर्जा सांभाळत असताना हिंदी गाण्यांच्या बाबतीत इतका कमअस्सलपणा का दाखविला गेला हे कळत नाही. मराठवाड्यात अशी सुमार दर्जाची कामे होतात आणि परत आम्ही मराठवाडा मागे म्हणून रडगाणे गात बसतो. अनुशेष शिल्लक राहिला म्हणून बोंब मारतो. बुद्धीचा प्रतिभेचा हा जो अनुशेष आपण निर्माण करतो तो भरून काढायचा कधी?
अभंग वाचकनिशी 2015
गाणे कवी गायक संगीतकार चित्रपट इ.स.
1. बाबूल मोरा नैहर छूटो ही जाय- वाजीद अली सैगल रायचंद बोराल स्ट्रीट सिंगर 38
2. जिंदगी भर नही भूलेंगे साहिर रफी रोशन बरसात की रात 57
3. ये जिंदगी उसी की है राजेंद्रकृष्ण लता सी रामचंद्र अनारकली 53
4. बिछडे सभी बारी बारी कैफी आजमी रफी एसडी बर्मन कागज के फुल 59
5. वक्त ने किया क्या हसी सितम कैफी आजमी गीता एसडी बर्मन कागज के फुल 59
6. जाने वो कैसे लोग थे जिनके साहिर हेमंत एसडी बर्मन प्यासा 57
7. प्यार किया तो डरना क्या शकिल लता नौशाद मुगल-ए-आझम 60
8. दो सितारों का जमी पर शकिल लता/रफी नौशाद कोहीनूर 60
9. मधुबन मे राशिका नाचे रे शकिल रफी नौशाद कोहीनूर 60
10.ए मालिक तेरे बंदे हम भरत व्यास लता वसंत देसाई दो आंखे बारा हात 57
11. अभी ना जावो छोडकर साहिर अशा/रफी जयदेव हम दोनो 61
12. आपकी नजरो ने समझा राजा मे.अली लता मदनमोहन अनपढ 62
13. ए मेरे दिल की और चल शैलेंद्र तलत शंकर जयकिशन दाग 52
14. अजीब दास्तां है ये शैलेंद्र लता शंकर जयकिशन दिल अपना और.60
15. रात भी है कुछ साहिर लता जयदेव मुझे जीने दो 63
16. जो वादा किया वो साहिर लता/रफी रोशन ताजमहल 63
17. कई बार यूं भी देखा योगेश मुकेश सलील चौधरी रजनीगंधा 74
18. दिल चीज क्या है शहरयार आशा खय्याम उमराव जान 81
19. शाम ए गम की कसम मजरूह तलत खय्याम फूटपाथ 53
20. लागा चुनरी मे दाग साहिर मन्ना रोशन दिल ही तो है 63
21. वो शाम कुछ अजीब थी गुलजार किशोर हेमंत कुमार खामोशी 69
22. कर चले हम फिदा कैफी रफी मदनमोहन हकिकत 64
23. तेरे बिना जिंदगीसे कोई गुलजार लता/किशोर आरडी बर्मन आंधी 75
24. मेरा कुछ सामान गुलजार आशा आरडी बर्मन इजाजत 87
25. मेरे मेहबूब तुझे मेरी शकिल रफी नौशाद मेरे मेहबूब 63
26. एक बगल मे चांद होगा पियूष मिश्रा पियूष मिश्रा स्नेहा खानविलकर ग्यॅग्ज ऑफ वासेपूर 12
27. आवोगे जब तूम ओ इर्शाद कामिल राशीद खा संदेश शांडिल्य जब वी मेट 07
28. चलते चलते मुझे कोई कैफी लता गुलाम मोहम्मद पाकिजा 71
29. चोदहवी का चांद हो शकिल रफी रवी चौदहवी का चांद 60
30. उडे जब जब जुल्फे तेरी साहिर आशा/रफी ओ.पी. नय्यर नया दौर 57
31. चाहे कोई मुझे जंगली कहे शैलेंद्र रफी शंकर जयकिशन जंगली 61
32. अफसाना लिख रही हू शकिल उमादेवी नौशाद दर्द 47
33. कभी तनहाई मे केदार शर्मा मुबारक बेगम स्नेहल भाटकर हमारी याद आयेगी 61
34. कांटो से खींच के ये आंचल शैलेंद्र लता एसडी बर्मन गाईड 65
35. दिल आज शायर नीरज किशोर एसडी बर्मन गॅम्बलर 71
36. दोस्त दोस्त ना रहा शैलेंद्र मुकेश शंकर जयकिशन संगम 64
37. कभी कभी मेरे दिल मे साहिर मुकेश खय्याम कभी कभी 76
38. रसिक बलमा हसरत लता शंकर जयकिशन चोरी चोरी 56
39. दुनिया बनाने वाले हसरत मुकेश शंकर जयकिशन तिसरी कसम 66
40. ओ सजना बरखा बहार शैलेंद्र लता सलील चौधरी परख 60
41. लग जा गले राजा मे.अली लता मदनमोहन वह कौन थी 64
42. कही दूर जब दिन ढल जाये योगेश मुकेश सलील चौधरी आनंद 78
43 ए दिल है मुश्किल है मजरूह रफी/गीता ओ.पी. सीआयडी 56
44. रूप तेरा मस्ताना आनंद बक्षी किशोर एसडी बर्मन आराधना 69
45. कोई ये कैसे बताए कैफी जगजीत जगजीत अर्थ 83
46. रघुवीर तुमको मेरी लाज तुलसीदास भीमसेन जयदेव अनकही 78
47. यू हसरतों के दाग राजेंद्रकृष्ण लता मदनमोहन अदालत 58
48. जीवन से भरी तेरी आंखे इंदिवर किशोर कल्याणजी आनंदजी सफर 70
49. खै के पान बनारसवाला अंजान किशोर कल्याणजी आनंदजी डॉन 78
50. दर्द दिलों के कम हो जाते समीर अंजान मो.इरफान हिमेश रे. द एक्सोपोज 14
51. तू गंगा की मौज मै शकिल लता/रफी नौशाद बैजू बावरा 52
52. धीरे से आजा रे अखियन मे राजेंद्रकृष्ण लता सी रामचंद्र अलबेला 51
०००००
मागील वर्षी जी वाचाकनिशी प्रकाशित झाली होती तिच्यावरवचे माझे आक्षेप इथे देतो आहे. म्हणजे सातत्याने कशी सुमार कामे चालतात याचा अंदाज यावा....
वाचकनिशीच्या संपादनातील संपादकाच्या डुलक्या
मराठी वाचकांना समृद्ध करण्यासाठी अभंग पुस्तकालय नांदेड यांनी ‘अभंग वाचकनिशी 2014’ या नावाने एक दैनंदिनी प्रसिद्ध केली आहे. त्याची जाहिरात करण्यात पैसा कशाला घाला म्हणून प्रकाशकांनी क्लृप्ती लढवित महत्त्वाच्या दैनिकांत त्यावर लेख छापून आणले आहेत. त्यांच्यावर स्वत:चेच पुस्तक कसे काय निवडले असा आरोप करताच आपल्या संपादन कौशल्याचे समर्थन त्यांनी केले. असे असेल तर त्यांनी खालील प्रश्नांची उत्तरे त्यांच्या वाचकांना द्यावीत.
जी.ए.कुलकर्णी यांची दोन पुस्तके काजळमाया व पिंगळावेळ त्यांनी शिफारस म्हणून दिलेली आहेत. यापेक्षा जी.ए.च्या निवडक कथांचे पुस्तक डोहकाळीमा, (संपा. म.द.हातकणंगलेकर) त्यांनी का नाही दिलं? पु.ल.देशपांडे यांची दोन पुस्तके ‘व्यक्ति आणि वल्ली’ व ‘जावे त्यांच्या देशा’ निवडली आहेत. मग ‘पु.ल.एक साठवण’ संपा. जयवंत दळवी हे पुस्तक निवडता आले नसते का? तसेच श्री.दा.पानवलकर यांचे एका नृत्याचा जन्म, इंदिरा संत यांचे गर्भ रेशिम, बोरकरांची समग्र कविता, नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता, ना.धो.महानोर यांच्या रानातल्या कविता या सर्व पुस्तकांपेक्षा या लेखकांच्या निवडक साहित्याची जी पुस्तके मान्यवरांच्या विस्तृत प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाली आहेत. ती देणं सं.भा.जो. यांनी का टाळले?
बरं दुसरीकडे रसयात्रा-कुसुमाग्रज, सुहृदगाथा-पु.शि.रेगे, सर्वोत्तम रविंद्र पिंगे, राजेंद्र बनहट्टी यांच्या निवडक दीर्घकथा, निवडक ठणठणपाळ ही निवडक साहित्याची पुस्तके त्यांनी निवडली आहेत.
बरीच पुस्तके निवडायची राहून गेली असं म्हणणारे सं.भा.जो. यांच्याकडून स्वत:चे पुस्तक मात्र ‘राहून गेले’ असं करत नाहीत. जी पुस्तके निवडली नाहीत किंवा जी निवडली त्यांचे निकष काय हा तर कायमच विवाद्य विषय असतो. आणि त्यावर वाद हे होतीलच. पण जे काम समोर आले आहे त्यातील हे जे दोष संपादनाचे आहेत त्याची पावती कुणाच्या नावे फाडायची?
या 104 पुस्तकांमध्ये सर्वच फक्त आठच पुस्तके पुण्या-मुुंबई बाहेरची आहेत. नागिण -चारूता सागर, तणकट- राजन गवस (साकेत औरंगाबाद), रंग माझा वेगळा-सुरेश भट (साहित्य प्रसाद केंद्र नागपुर), ऑर्फियस-दिलीप चित्रे, भर चौकातील अरण्यरूदन- रंगनाथ पठारे, चाळेगत-प्रविण बांदेकर (शब्दालय श्रीरामपुर), बहिणाबाईंची गाणी-बहिणाबाई चौधरी (सुचित्रा प्रकाशन जळगांव). पुण्या-मुंबई खेरीच उर्वरीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर हैदराबाद सारख्या ठिकाणी जे काही प्रकाशनाचे काम चालते ते इतके दुय्यम आहे की त्याची दखलही घेवू नये?