दि. ८ जुलै २०१२ दैनिक कृषीवल मधील लेख
महाराष्ट्रातील सर्वात जून्या असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने आपला 172 वा वार्षिक सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच साजरा केला. परवाच्या ग्रंथालयांच्या पटपडताळणीच्या पार्श्र्वभूमीवर हा समारंभ जास्तच उठून दिसत होता. साहित्य संमेलनाच्या सरकारी पैशाच्या उधळपट्टीने साजर्या होणार्या उरूसी उत्सवाच्या पार्श्र्वभूमीवरही या समारंभाचे वेगळेपण समजून घेता येईल.
मूळात वाचनालयांनी कश्या पद्धतीने काम करावे, एखाद्या शहराच्या सांस्कृतिक जडण घडणीत त्यांची काय भूमिका असावी हे समजून घ्यायचं असेल तर सावानाची काम करण्याची पद्धत समजून घ्यायला हवी. शासनाची मदत अपुरी आहे हे सगळ्यांनाच माहित असते. पण त्यावर मात करण्याची तयारी नसते. उलट शासनाची जी मदत मिळत आहेत त्यातच आपलाही वाटा कसा वेगळा काढता येईल यातच आमची बुद्धी खर्च होते. जिल्हा अ दर्जाच्या सार्वजनिक वाचनालयांना महाराष्ट्र शासन दरवर्षी रू 4,80,000/- इतके अनुदान देते. यातील अर्धी रक्कम वेतनावर खर्च करण्याची असते. म्हणजे 2,40,000 इतकी रक्कम वेतनावर कागदोपत्री खर्च होते. बरीच वाचनालये यापेक्षाही कमी रक्कम प्रत्यक्षात कर्मचार्यांना देतात आणि बाकी रक्कम ‘ऍडजस्ट’ करतात. ‘सावाना’ (सार्वजनिक वाचनालय नाशिक) दरवर्षी केवळ वेतनावरच 12,00,000 रूपये खर्च करते. यावरूनच शासकीय निधीचा फोलपणा आणि सावानाने केलेले आर्थिक नियोजन लक्षात येतो.
रोज येणार्या वाचकांची संख्या विचारात घेतली तरी अशा वाचनालयांंनी किती मोठा पल्ला गाठला आहे हे लक्षात येते. या वाचनालयात दररोज किमान 300 ते 350 वाचक पुस्तकं बदलण्यास येतात. या वाचकांसाठी त्यांच्या शिफारशी देण्यासाठी वहि ठेवली आहे. आवडलेल्या पुस्तकांची नावे त्यात वाचकांनी लिहावयाची असतात. इतकंच काय पण न आवडलेल्या पुस्तकांची नोंद करण्याचीही सोय आहे. नविन आलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे दर्शनी भागात लावून ठेवली जातात. व्यंकटेश माडगुळकरांचे समग्र वाङ्मय मेहता प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. माडगुळकरांच्या सर्व पुस्तकांची मुखपृष्ठे दर्शनी भागात सध्या लावलेली आहेत.
फक्त पुस्तकांपुरतीच आपली जबाबदारी न मानता इतरही सांस्कृतिक भान या वाचनालयाने राखले आहे. एक चांगले वस्तु संग्रहालय आपल्या सभागृहात भरवले आहे. त्यात जुन्या काळची नाणी, नाशिक परिसरातील मंदिर शिल्पांची छायाचित्रे, जूने नकाशे यांचा नेटका संग्रह चांगल्या रितीने मांडून ठेवला आहे. इतकंच नाही तर नाशिक परिसरातील वाङ्मयीन उत्तूंग व्यक्तिमत्वे कुसूमाग्रज आणि वसंत कानेटकर यांच्या वापरातील काही वस्तूही या संग्रहात आवर्जून सांभाळून ठेवल्या आहेत.
वाचनालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागात पुस्तक प्रदर्शनासाठी सभागृही राखून ठेवले आहे. इतर गोष्टीसाठी हे सभागृह देण्यात येत नाही.
वाचनालयाला लागून असलेल्या मोठ्या भूखंडावर परशुराम साईखेडकर नाट्यगृह वाचनालयाने बांधून घेतले आहे. हे सभागृह वर्षभर कार्यक्रमांनी ‘हाउस फुल्ल’ असते. फक्त वाचनापुरतीच आपली जबाबदारी न मानता इतरही सांस्कृतिक गोष्टींची जाण ठेवली पाहिजे हे या यातून सिद्ध होते.
जो वार्षिक उत्सव वाचनालयाने पाच दिवस (29 जून-3 जूलै) घेतला त्याच्या नियोजनातही आपला शुद्ध सांस्कृतिक हेतू वाचनालयाने सिद्ध केला. अन्यथा अनेक छोटे मोठे साहित्यीक कार्यक्रम हे फक्त नावालाच साहित्यीक उरले आहेत. त्यात राजकीय शक्तींचा नको इतका उपद्रव वाढला आहे. परिस्थिती तर इतकी गंभीर आहे की राजकीय नेता उठून गेल्यावर सभागृहात कोणीच शिल्लक राहत नाही असंही घडलं आहे. कंधार (जि. नांदेड) येथे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी मा.ना. शरद पवार यांना आमंत्रित केले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याच्या अभ्यासक कवियत्री सुहासिनी इर्लेकर या होत्या. शरद पवार यांनी आपले उद्घाटकीय भाषण केले व कार्यबाहुल्यामुळे अध्यक्षांचे भाषण न एैकता लगेच निघून गेले. शरद पवार जाताच संपूर्ण मांडव रिकामा झाला. संमेलनाच्या अध्यक्षा सुहासिनी इर्लेकर यांना रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करावे लागले. समोरचे लोकच नाही तर मंचावरील साहित्य संस्थांचे पदाधिकारीही शरद पवारांच्या मागे मागे करत पसार झाले.
सावानाने आपल्या कार्यक्रमात कुठल्याही राजकीय नेत्यांना आमंत्रित केले नाही. 2 जूलैचा जो मुख्य कार्यक्रम होता त्याचे नियोजन तर अतिशय नेटके होते. सात साहित्यीकांना पुरस्कार देण्यात येणार होते. त्यांच्या सात खुर्च्या उंचावर मांडण्यात आल्या होत्या. ज्यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण होणार होते ते प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर व वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर अशा दोनच खुर्च्या समोरच्या रांगेत मांडल्या होत्या. पडदा उघडला तेंव्हा मंचावर अंधार होता. मागच्या पडद्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. बासरीच्या सुरांनी कार्यक्रमाची सुरवात झाली. बासरी संपल्यावर प्रत्यक्ष प्रकाश पडला तेंव्हा कळले की सगळे पाहूणे खुर्च्यांवर स्थानापन्न झालेले असून, बासरीचे हे सूर रेकॉडेड नसून प्रत्यक्ष समोर बसून कलाकाराने ते सादर केले आहेत.
मंचावर एकही जास्तीची खुर्ची मांडण्यात आली नव्हती. उशीर करून कुणीही अण्णासाहेब, दादासाहेब, नानासाहेब धोतर सावरीत आणि डोक्यावरच्या गांधी टोपीचा कोन सांभाळीत मंचावर घुसले नाहीत. नेटके व नेमके निवेदन, सात पुरस्कार प्राप्त लेखकांची अतियश थोडक्यात मनोगते, वाचनालयाच्या अध्यक्षांचे प्रास्ताविक आणि कुमार केतकरांचे मुख्य भाषण या सगळ्यासहीत कार्यक्रम दोन तासात आटोपला.
कार्यक्रमाला मोजक्या तिनएकशे लोकांची गर्दी होती. हे सगळे साहित्य रसिक आहेत हे सहजच कळत होते. साहेबांना तोंड दाखवले म्हणजे आपले काम होईल अश्या लाचारांचा भरणा या गर्दीत नव्हता. ही सगळी माणसं समोर लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनातून फिरून आली होती. काही जणांच्या हातात खरेदी केलेली पुस्तके होती. पुरस्कारप्राप्त लेखकांना भेटून त्यांच्या पुस्तकावर चर्चा करण्याची उत्सूकता प्रेक्षकांना होती. काही वाचकांनी ते धाडस केलेही.
या सगळ्या पोषक वातावरणामुळेच साहित्य संस्कृतिला बळ मिळते हे वेगळं सांगायची गरज नाही. वाचनालयाचे पदाधिकारीही आलेल्या पाहूण्यांची आदबीने सरबराई करण्यात गुंग होते.
हे वातावरण महाराष्ट्राच्या इतर भागात कधी पहायला मिळेल? आजही असे सोहळे हेच साहित्य संस्कृतिसाठी प्राणवायू ठरले आहेत. अकोल्याचे बाबुजी देशमुख वाचनालय, सोलापूरचे हिराचंद नेमचंद वाचनालय, परभणीचे गणेश वाचनालय, औरंगाबादचे जीवन विकास ग्रंथालय, चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालय (जिथे आता अ.भा.मराठी साहित्य संमेलन होउ घातले आहे) अश्या फार थोड्या संस्था महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्रात ज्यांना स्वत:च्या इमारती आहेत, छोटंसं का असेना सभागृह आहे, किमान 100 तरी नियमित वाचकांचा राबता आहे अशा जिल्हा, तालूका अ वर्गाच्या ग्रंथालयांची संख्या आहे 238. यातील किमान 100 केंद्र वाङ्मयीन चळवळीची केंद्र म्हणून विकसित करता येतील.
आज गरज आहे ती संपूर्ण साहित्य चळवळ त्या त्या ठिकाणच्या वाचनालयांना, वाचकांना आणि ग्रंथकर्त्यांना केंद्रभागी ठेवून निकोपपणे चालविण्याची. जर साहित्य संमेलने, साहित्यीक हे वाचनालये आणि वाचकांपासून तूटून पडले तर राहिले काय?

No comments:
Post a Comment