Wednesday, January 5, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९५


उरूस, 5 जानेवारी 2022 



(कालीचरण महाराज नावाच्या कुणी व्यक्तीने महात्मा गांधींबद्दल अपशब्द काढले आणि त्यावर प्रतिक्रिया देताना गांधीवाद्यांचाच विवेक घसरला. याची दखलच घेतली नसती तर हा माणूस चर्चेत आलाच नसता.)



(पंजाबात नियोजीत प्रचार सभा सोडून राहूल गांधी विदेशात हॅप्पी न्यु इयर करायला निघून गेले.)





(सिंधुताई सपकाळ यांचे 4 जानेवारी रोजी दु:खद निधन झाले. या जगन्मातेला विनम्र श्रद्धांजली.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, January 4, 2022

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९४

 
उरूस, 2 जानेवारी 2022 



(सरत्या वर्षाचे आपत्तीचे विष पचवून निर्मळ जगणे परत खळखळू द्या.)




(महाराष्ट्र विधानसभा सभापती निवडणुक नियमांत बदल करून ती घेण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाने राज्यपालांकडे पाठवला. त्यावर तातडीने उत्तर देण्यास ‘धमकावले’. पण राज्यपाल कोशियारी यांनी त्याला नकार देत ही निवडणुक अशा पद्धतीनं घेता येणार नाही असे स्पष्ट केले. शेपुट घालत मविआ सरकारला माघार घ्यावी लागली.  )




(सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या निवडणुकीत राणेंनी एकत्रित मविआ च्या पॅनेलचा पराभव केला. खरं तर या इतकुशा निवडणुकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालायची गरज नव्हती. पण त्यांनी विनाकारण यात पडून स्वत:चे हसे करून घेतले.)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९३


उरूस, 30 डिसेंबर 2021 


(समीर वानखेडे यांच्यावर शाहरूख खान कडून खंडणी मागितल्याचा आरोप नबाब मलिक यांनी केला होता. त्यासाठी नेमलेल्या एसआयटी ने यात काहीच तथ्य सापडले नाही म्हणून तपास थांबवला. तसे स्पष्ट निवेदन वळसे पाटील यांना विधानसभेत करावे लागले.  )




(रितेश राणे यांनी विधीमंडळाच्या पायरीवर बसून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून म्यांव म्यांव असा उच्चार काढला. त्यावरती मोठा गदारोळ सत्ताधारी आघाडीने माजवला.)




(वर्धापन दिनी कॉंग्रेस कार्यालयात झेंडावंदन करताना दोरीवरून गाठ सुटून झेंडा दाणकन खालीच पडला. सोनिया गांधींच्या हस्ते हे झेंडावंदन होत होते. दीर्घ काळ त्याच अध्यक्षपदावर राहिल्या आहेत.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, December 27, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९२

 
उरूस, 27 डिसेंबर 2021 



(उत्तराखंड मध्ये विधानसभा निवडणुका होवू घातल्या आहेत. आणि नेमक्या त्या पार्श्वभूमीवर नेतृत्वाचा प्रश्‍न उफाळून समोर आला आहे. ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी पक्षाच्या विरोधात ट्विट करत आपली अस्वस्थता जाहिर केली आहे. )



(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारपणामुळे विधानसभेचे अधिवेशन चालू असताना सभागृहात आलेच नाहीत. तसेही त्यांनी विधीमंडळात आत्तापर्यंत कधी चमकदार कामगिरी दाखवली नाही. त्यांचे एकही भाषण गाजले नाही.)



(उत्तर प्रदेशातील कानपुर येथे अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्याकडे 150 रूपयांची रोकड सापडली. त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. पियुष जैन हे समाजवादी पक्षाशी संबंधीत आहेत.  )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, December 24, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९१

उरूस, 24 डिसेंबर 2021 



(जया भादूरी बच्चन यांनी राज्यसभेत संताप व्यक्त करत भाजपला तुमचे बुरे दिन येतील असा शाप दिला. त्याला कारण घडले ते म्हणजे ऐश्‍वर्या राय यांना आलेल्या ईडीच्या नोटीसा आणि चौकशीचे समन्स. )



(मतदान ओळखपत्र आणि आधार यांची जोडणी करण्याचे विधेयक संसदेने मंजुर केले. विरोधकांनी त्याला नेहमीप्रमाणे अपेक्षीत असा निरर्थक विरोध केला.)



(गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात भर सभेत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे वचन दिले नव्हते असा खुलासा केला. सेना खोटे बोलत आहे. त्यांनी धोका दिला. यावर कसलेच नेमके उत्तर सेनेला देता आले नाही. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, December 23, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ९०

उरूस, 21 डिसेंबर 2021 



(सेनाप्रमुख बिपीन रावत यांचे कटआऊट उत्तराखंड मध्ये कॉंग्रेसने प्रचारादरम्यान वापरले. त्यावरून आता वाद उसळला आहे. ज्या सेनाप्रमुखांना कॉंग्रेसच्या संदिप दिक्षीत यांनी गली का गुंडा असे संबोधले आता त्याचे कटआऊट का वापरले जात आहे? )



(कर्नाटक विधानसभेत माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे आमदार रमेशकुमार यांनी इफ रेप इज अनऍव्हॉयडेबल त्यांना लेट अस एंजॉय असे आक्षेपार्ह विधान केले. दुर्दैवाने त्याला सर्व पक्षीय आमदारांनी हसत खिदळत दाद दिली.)



(गृहमंत्री अमित शहा यांनी प्रवरानगर येथे एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राबद्दल शंका उपस्थित केल्या. सहकार कसा बुडवला गेला याचा पाढा वाचला. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, December 20, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८९

उरूस, 18 डिसेंबर 2021 




(स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वौच्च न्यायालयाने निकाली लावला. त्यावरून आता राजकारण रंगू लागले आहे. या जागा आता खुल्या प्रवर्गात घेवून तेथे निवडणुक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. )



(किराणा दुकानात वाईन विक्रीस ठेवता येईल अशी चर्चा सरकारी पातळीवर चालू आहे.)



(बांग्लादेश निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाली. हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करण्यात आला. कॉंग्रेसने उत्तराखंड मध्ये प्रचार रॅलीत सेनापती बिपीन रावत यांचे कटआउट वापरले. त्यावरून वाद उसळला.)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575