Saturday, February 23, 2013

‘मृत्युंजय’ मेहता । तूमचे कर्तूत्व सांगता?


दैनिक कृषीवल दि. २३ फेब्रुवारी २०१३  "उरूस" या सदरातील माझा लेख 
-----------------------------------------------------------------------

मराठीतील अतिशय प्रसिद्ध कादंबरी ‘मृत्युंजय’ परत एकदा चर्चेत आली आहे. तसं विशेष काही कारण घडलं नाही. लेखक शिवाजी सावंत यांची जन्मशताब्दि नाही की या कादंबरीला लिहून 50 वर्षे वगैरे झाली असंही नाही. मराठीतील एक नामवंत व प्रसिद्ध प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी या कादंबरीचे हक्क मिळवले. तीची किंमत 375 रूपये असून ती आता सवलतीत 300 रूपयांना उपलब्ध होणार अशा जाहिराती वर्तमानपत्रांत चालू झाल्या आहेत. मेहतांनी कॉंन्टिनेंटल प्रकाशनावर मात करून हे हक्क मिळवले म्हणून याची चर्चा काही वृत्तपत्रांनी जाणीवपूर्वक घडवून आणली. नंतर या पुस्तकाच्या मोठ मोठ्या जाहिराती त्या वृत्तपत्रांमध्ये दिसून आल्यावर चर्चा का घडवून आणली तेही कळाले.
या पूर्वी याच सदरात पन्नास रूपयांत पुस्तकांचा जो बाजार मांडल्या गेला होता. त्यावर लिहीले होते. तेंव्हाही असेच वर्तमानपत्रांनी या बाबत भलामण करणारे लेख /स्फुटे प्रसिद्ध केली होती. लगेच या पन्नास रूपयांच्या हरमाल बाजाराची जाहिरातच त्या वृत्तपत्रांमध्ये यायला लागली. आणि मग या ‘पेड न्यूज’ला असलेला वास सगळ्यांनाच आला. आताही तेच झाले आहे.
असं काय घडलं? आणि जे घडलं त्यात मेहता प्रकाशनाचे कतृत्व ते कोणते? गेली 45 वर्षे ‘मृत्युंजय’ ही कादंबरी कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडे होती. त्यांनी तिची किंमतही तूलनेने इतर पुस्तकांच्या मानाने कमी ठेवली होती. पुस्तकाच्या मानधनाबाबत कधीही शिवाजी सावंतांची तक्रार असल्याचे त्यांच्या हयातीत समोर आलं नाही. शिवाय त्यांनी त्यांची इतर पुस्तकेही छावा, युगंधर ही कॉंन्टिनेंटल प्रकाशनाकडेच दिली होती. त्यावरूनही त्यांचे प्रकाशकाशी असलेले ऋणानुबंध लक्षात येतात. मग आताच या पुस्तकाचे हक्क त्यांच्या वारसांनी मेहता प्रकाशनाकडे द्यावे असं काय घडलं?
एका प्रकाशकाकडून पुस्तके दुसर्‍याकडे जाण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडतो आहे का? असंही नाही.
कुठलाही प्रकाशक जेंव्हा एखाद्या लेखकाला ग्रंथरूपात सामोरा आणतो तेंव्हा त्यामागे त्याच्या व्यवसायाचा जसा भाग असतो त्याप्रमाणेच त्याच्या वाङ्मयीन निष्ठेचा, दृष्टीचाही एक मोठा भाग असतो. तसा नसता तर हा व्यवसाय सोडून इतर दुसरा नफेखोर व्यवसाय त्याने निवडला असता. रणजित देसाईंची ‘स्वामी’, ‘श्रीमान योगी’ ही पुस्तके अतिशय देखण्या स्वरूपात देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केली. वाचकांना ही पुस्तके स्वस्तात मिळावी म्हणून योजनाही राबवल्या. पु.ल.देशपांडे यांचीही पुस्तके देखण्या स्वरूपात देशमुखांनी पहिल्यांदा प्रकाशित केली. ही पुस्तके नंतरच्या काळात दुसर्‍या प्रकाशकांकडे गेली तेंव्हा त्यांना पूर्ण सहकार्य स्वत: देशमुखांनी केले. ‘व्यक्ती आणि वल्लीचे’ तर मुखपृष्ठही जूनेच ठेवण्याचा निर्णय मौज प्रकाशनाने घेतला. पाडगांवकरांचे कवितासंग्रह सुरूवातीला पॉप्युलरने प्रकाशित केले होते. मौजेकडे पुढची पुस्तके गेल्यावर मागची पुस्तकेही मौजेने देखण्या स्वरूपात प्रकाशित केली शिवाय सतत उपलब्धही करून दिली. शक्यतो दुसर्‍या प्रकाशनाचा लेखक आपण पळवू नये असा अलिखित नैतिक संकेत प्रकाशक विश्वात आहे.
या वादाला खरी सुरवात झाली ती वि.स.खांडेकरांच्या ‘ययाती’ या कादंबरीच्या निमित्ताने. खांडेकरांच्या हयातीत या कादंबरीचे तसेच आपल्या इतर लिखाणाचे हक्क त्यांनी देशमुखांना दिले होते. स्वत: खांडेकर, देशमुख पतीपत्नी या तिघांच्या निधनानंतर खांडेकरांच्या वारसांनी हे हक्क मेहतांना दिले. त्यावरून वाद झाला. हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत देशमुख आणि कंपनीने नेला. पण त्यांना यश आले नाही. हळू हळू खांडेकरांची सर्वच पुस्तके मेहतांनी मिळवली. आणि तेंव्हापासून मेहतांचा हा जून्या लेखकांची पुस्तके जिंकण्याचा ‘अश्वमेध’ सुरू झाला. खांडेकरांच्या नंतर, रणजित देसाई, व.पु.काळे, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, द.मा.मिरासदार यांच्या सर्व पुस्तकांच्या प्रकाशनाचे हक्क त्यांनी जिंकून घेतले. जिंकून घेतले असं म्हणायचं कारण म्हणजे यावर तीव्र प्रतिक्रिया त्या त्या वेळी उमटत गेल्या होत्या. एक द.मा.मिरासदारांचा अपवाद वगळता इतर सर्व लेखकांच्या लिखाणाचे हक्क मेहतांनी लेखकाच्या मृत्यूनंतरच घेतले. हेही नमुद करावं लागेल.
कुणाला यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे असं वाटेल. मुद्दा असा आहे की जर मेहतांना चांगली व्यवसाय दृष्टी होती तर त्यांना आतापर्यंत वाचकांना पसंद पडणारे लेखक का नाही शोधता आले? विशेषत: ललित पुस्तकांच्या बाबत ज्यांना आधीच प्रतिसाद मिळाला आहे, वाचकांनी पसंतीची पावती दिली आहे तेवढीच पुस्तके त्यांनी मिळवली. यात प्रकाशक म्हणून मेहतांचे कर्तुत्व काय? ललित पुस्तके तर सोडाच पाकक्रियेचे अतिशय खपणारे कमलाबाई ओगले यांचे ‘रूचिरा’ हे पुस्तकही मेहतांनी दुसर्‍या प्रकाशकाकडून उचलले.
आक्षेप फक्त इथेच थांबत नाही. ज्या ज्या प्रकारच्या पुस्तकांना बाजारात चांगला प्रतिसाद मिळत गेला, ज्यांची ज्यांची चर्चा होत गेली त्या त्या पुस्तकांशी साधर्म्य साधणारी पुस्तके मेहतांनी बाजारात आणली. ती फारशी चालली नाही ही गोष्ट अलाहिदा. पण त्यातून ग्रंथ व्यवहारात एक गोंधळाचे वातावरण तयार झाले. ‘शतक शोधांचे’ पुस्तक रोहन प्रकाशनाने काढले की लगेच त्यासारखे मेहतांचे पुस्तक बाजारात हजर. ‘अग्निपंख’ राजहंस ने काढले की लगेच अब्दूल कलामांचे चरित्र मेहतांचे बाजारात. मोहन आपटेंची विज्ञान विषयक पुस्तक सातत्याने राजहंस प्रकाशनाने त्यांच्याकडून लिहून घेवून बाजारात आणली. की लगेच निरंजन घाटेंना पकडून मेहतांची पुस्तके बाजारात. विश्वास पाटील यांची एक लेखक म्हणून प्रतिमा तयार करण्यात राजहंस प्रकाशनाचा मोठा वाटा आहे हे स्वत: विश्वास पाटीलच मान्य करतात. अशा विश्वास पाटील यांच्याकडून मोठ्या मानधनाचे किंवा अजून कशाचेही आमिष दाखवून ‘संभाजी’ मेहतांनी लिहून घेतली. मेहतांना स्वत:ला लेखक शोधायचा कंटाळा आहे का? का ते कर्तृत्व त्यांच्याकडे नाही? आता शिवाजी सावंतांची ‘छावा’ आणि विश्वास पाटलांची ‘संभाजी’ या दोन्ही मेहतांकडेच आहेत. मग ते कुठल्या कादंबरीला पुढे आणणार? ‘संभाजी’ काढूनही त्यांना ‘छावा’ची पुण्याई किंवा कमाई गाठी बांधता आली नाही असंच म्हणायचं का?
पर्ल बक या नोबेल पारितोषिक लेखिकेची ‘द गुड अर्थ’ ही अतिशय अप्रतिम कलाकृती मेहता प्रकाशनाने ‘काळी’ या नावाने प्रकाशित केली. खरं तर ही कादंबरी यापूर्वीच मराठीत प्रकाशित झाली होती. मेहतांनी मात्र चक्क पहिलीच आवृत्ती असल्याचे छापले आहे. या वृत्तीला कुठल्या प्रतिची व्यवसायिकता म्हणावयाचे?
एक होता कार्व्हर सारख्या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाल्यावर राजहंस ने वीणा गवाणकरांकडून अनेक चांगली चरित्रं लिहून घेतली. रा.चिं.ढेरेंची पुस्तके सातत्याने पद्मगंधाने प्रकाशित करून त्यांची एक प्रतिमा तयार केली. रोहन प्रकाशनाने पाकक्रियांच्या पुस्तकांची मालिकाच काढून आपली वेगळी ओळख सिद्ध केली. शिवराज गोर्लेंकडून ‘मजेत जगावं कसं’, ‘माणसं जोडावी कशी’, ‘सुजाण पालकत्व’ अशी पुस्तकं राजहंस नी लिहून घेतली.  मौज, पॉप्युलर, मॅजेस्टीक, देशमुख, कॉन्टिनेंटल ही प्रकाशनं काही लेखकांनी धरून असायची. त्यांच्या पुस्तकांना एक चेहरा होता.असं काही मेहतांना करता आलं का?
लहान मुलांच्या मनोविश्वावर अमर चित्रकथांनी एक गारूड केलेले आहे. या चित्रकथांनी कितीएक पिढ्यांवर राज्य केले. या चित्रकथा आता मेहतांकडे आहेत. मग त्यांना जोडून परत काही नविन चित्रकथा त्यांना तयार करता आल्या का? मेहतांनी प्रकाशित केलेल्या लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये वाक्यरचनेच्या प्रचंड चुका आहेत. चित्रेही नवनित प्रकाशनाची नक्कल केल्यासारखी आहेत. मग ज्योत्स्ना प्रकाशनासारखे मुलांच्या पुस्तकांत त्यांना नाव का नाही कमावता आले? माधुरी पुरंदरे सारख्या मुलांसाठी लिहीणार्‍या चित्रं काढणार्‍या प्रतिभावंत साहित्यीकाचा शोध मेहतांना कसा नाही लागला?
साने गुरूजींच्या लिखाणाचे हक्क खुले झाल्यावर ते छापण्याची लाटच सध्या आली आहे. मेहतांनी साने गुरूजींचे काय छापले की नाही मला माहित नाही पण ते नक्कीच छापतील. त्यांचे बंधु शितल मेहता ‘अजब’ नावाने छापतच आहेत. पण कुणीतरी परत साने गुरूजी छापत असताना भालचंद्र नेमाडेंनी ‘साने गुरूजी एक पुनर्मुल्यांकन’ सारखं पुस्तक लिहीलं तसं काही काम या लेखकांवर केलं आहे का? समग्र व्यंकटेश माडगुळकर छापताना त्यांच्या वाङ्मयावर एखाद्या मान्यवराकडून सविस्त लिहून घ्यावं असं मेहतांना का नाही वाटलं?
बाबाराव मुसळे सारखा मोठा लेखक जो मेहतांनी मराठी वाचकांसमोर आणला, नंतर त्याला सोडून दिले. इंद्रजित भालेराव सारखा मोठा कवि मेहतांनी पहिल्यांदा समोर आणला. मग नंतर त्याचं एकही पुस्तक मेहतांनी काढलं नाही. राजन गवस यांची काही पुस्तके काढली आणि मग तो लेखक सोडून दिला. ह.मो.मराठे सारखा मोठा लेखक अभ्यासक्रमला लागला की मेहतांनी प्रकाशित केला. अभ्यासक्रम संपला की त्यांनी वार्‍यावर सोडून दिला. भैरप्पा सारखा मोठा कानडी लेखक त्यांनी मराठीत आणला. आणि आपणच प्रकाशित केलेली त्यांची ‘तंतू’, ‘मंद्र’ सारखी मोठी पुस्तके नंतर वार्‍यावर सोडून दिली. ‘पर्व’सारखी पुस्तकं आधून मधून बाजारातून गायब करण्याची खेळीही त्यांचीच. याला निर्दोष ग्रंथव्यवहार मानायचा का?
वाङ्मयीन पुस्तकांबाबत बोललं की सगळ्यांच्याच कपाळावर आठ्या उमटतात. ते सगळं न खपणारं असतं. त्याची औकात काय असा एक प्रश्न काही वितरक, प्रकाशक, न वाचणारे सरकारी अधिकारी, विविध साहित्य संमेलनांचे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे दलाल (त्यांना वाचक कसं म्हणायचं? ज्यांचा वाचनाशी संबंच नाही) यांना पडतो.  
 माझा त्यांना प्रश्न आहे. मग बाबा कदम सारखा खपणारा एखादा लेखक मेहतांना प्रसिद्धीस आणता आला का? वाङ्मयीन नसलेले मोहन आपटे, अच्युत गोडबोले, शिवराज गोर्ले, वीणा गवाणकर, रा.चिं.ढेरे यांना का नाही सापडले? वैचारिक मध्ये तर मेहतांकडे सगळा ‘पांगलेला पावसाळा’च आहे. कुमार केतकरांची पुस्तके यांच्याकडे होती मग पुढची पुस्तके का नाही आली?
मेहतांना किमान नैतिकता पाळता येत नसेल तर काय बोलणार. त्याहीपेक्षा मला जास्त वाईट वाटते की या मोठ्या लेखकांच्या वारसांनी आपल्या वाडवडिलांच्या कलाकृतीसाठी मिळणारा पैसाच फक्त जाणला, त्याची प्रतिष्ठा नाही जाणली. भविष्यात चि.वि.जोशींची सगळी पुस्तके मेहतांकडे आलेली दिसली तर आश्चर्य वाटायला नको.  

Saturday, February 9, 2013

हर माल पचास; वाचनाचा कसला विकास?

दि. ६ फेब्रुवारी २०१३ महाराष्ट्र टाइम्स, मुंबईतील माझा लेख

सध्या कॉपीराईट संपलेल्या अनेक पुस्तकांची विक्रीधूम धडाक्यात चालू आहे पन्नास रुपयांना एक पुस्तक मिळतअसल्याने त्यावर वाचकांच्या उड्याही पडत आहेत मात्र यासाऱ्या योजनेची दुसरीही एक बाजू आहे त्या बाजूवर हाप्रकाश ... 

ग्रंथांच्या सहवासात या अग्रलेखात ५० रूपयात पुस्तक या योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाचा उल्लेख आहे मात्र ,त्याची दुसरी बाजूही आहे नाथ माधव सावरकर ,लक्ष्मीबाई टिळक साने गुरूजी अशा लेखकांची पुस्तके हरकिताब ५० रूपये योजनेत आहेत ज्या पुस्तकांचे स्वामित्वअधिकार कॉपीराईट खुले झाले अशी पुस्तके याप्रकाशकाने छापली मोठी आवृत्ती काढली . ( अंदाजे दहाहजार प्रती ). 

वाचनालयांना घसघशीत सवलत जाहीर केली इतकं करूनही पुस्तके खपेनात मग सवलत वाढवली ती ९०टक्के इतकी केली इतकं करूनही आवृत्ती संपेना कारण ज्यांना शक्य होतं त्या सर्व वाचनालयांनी ही छापीलकिमतीवर ९० टक्के सूट असलेली पुस्तके खरेदी केली पण सरकारदरबारी बिलावर १५ टक्के इतकी सवलतदाखविण्यात आली म्हणजे शंभर रूपयांचे पुस्तक दहा रूपयांना खरेदी करावयाचे बिलात खरेदी ८५ रूपयांना .हे वरचे ७५ रूपये कुठे गेले या घोळात वाचनालयांची खरेदीक्षमता संपल्यावर कागदोपत्री तीन तीन वर्षांचीरक्कम या व्यवहारात खर्ची पडली 

परत पुढच्या वर्षी विक्रेते या वाचनालयांकडे गेले तेव्हा बजेट च संपून गेलेले आता काय करायचं मग यांनीविक्रेत्यांना आमीष लावून त्यांच्याकडे माल चेपला .' तरी पुस्तके खपेनात मग ६५० रूपयांचे पुस्तक ५०रूपयांना म्हणून वाचकांसाठी सेल लावला हे म्हणजे सवलत ९० टक्क्यांपेक्षा जास्त आता ज्या विक्रेत्यांनी हामाल खरेदी केला होता त्यांनी यावर आक्षेप घेतला व पुस्तके प्रकाशकाला परत पाठवली काही वाचनालयांचीखरेदी पटपडताळणीत थांबवली गेली त्यांच्याकडे पुस्तके पडून राहिली या गोंधळात ही पुस्तके वाचकांपर्यंत तरीनेऊ व अडकलेले पैसे मोकळे करू अशी उदात्त योजना प्रकाशकाने आखली व ही पुस्तके वाचकांसाठी ५०रूपयांत एका अर्थाने रस्त्यावर आली पुस्तकांच्या फुगवलेल्या किमती आणि धरणांच्या फुगवलेल्या किमती यातआकड्यांची तफावत सोडली तर फरक नाही हे म्हणजे सामान्य माणसांनी कर भरावा त्या करातून सरकारनेवाचनालयांना अनुदान द्यावे आणि त्यावर वाचनालयांनी असा माज दाखवायचा यात कुठं आहे वाचनसंस्कृतीचाविकास जर प्रकाशकाला वाचकांची इतकी काळजी होती तर त्यांनी आधीच ही पुस्तके या किमतीत बाजारात कानाही आणली खरेतर हे सगळं गेली तीन वर्षे सुखेनैव चालू आहे 

मग सरकारने याला आवर का नाही घातला मार्च २०११ मध्ये ग्रंथालय संघाचे अधिवेशन नांदेडमध्ये भरले .तिथे पोस्टर्स लावून ही योजना राबविली गेली तेव्हाचे तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर हे घडलं त्यांनीकाहीच कारवाई केली नाही यात फायदा कुणाचा विक्रेता दहा ते वीस टक्के नफ्यावर काम करतो त्याला नव्वदटक्क्यांनी पुस्तक मिळाले तर तो सत्तर टक्क्यांनी विकतो आणि तीस टक्क्यांनी पुस्तक मिळाले तर तो दहाटक्क्यांनी विकतो त्याला कुठं काय फरक पडतोय जास्त कमिशनचा प्रकाशक लेखक मुद्रक अक्षरजुळणी ,चित्रकार या सगळ्यांना मिळून त्यांच्या कमाईच्या हिशोबात बघितलं तर फक्त एकूण छापील किमतीच्या दहा टक्केइतकी रक्कम मिळाली विक्रेत्याला दहा ते वीस टक्क्यांपर्यंत रक्कम मिळाली सरकारी बिलावर १५ इतकी सूटदाखवली गेली आणि काहीच न करणार्या ग्रंथालयातील कर्मचारी तपासणी अधिकारी यांनी ७५ टक्के इतकी सूटकमावली 

ग्रामीण भागात म्हण आहे सतीच्या घरी बत्ती आणि शिंदळीच्या दारी हत्ती तसं हे झालं ज्यानं काही केलं नाही ,त्यांना सगळ्यात मोठा वाटा आणि जे सगळे यासाठी झटत होते ते सग़ळे वीस टक्क्यांत आटोपले आता ही अशीदलालांना प्रमाणाबाहेर मोठं करणारी व्यवस्था टिकावी कशी शेतकरी चळवळीत जो पोशिंदा तोच उपाशी 'असं म्हणतात त्याच धर्तीवर ज्यांनी हे सगळं पेललं ते सगळ्यात उपेक्षित सामान्य वाचकांची इतकी काळजीआहे तर एकाही पुस्तकावर पन्नास रुपये ही किंमत का छापली नाही महाराष्ट्रात कुठल्याही ग्रंथालयात जाऊनबघा या पुस्तकांची बिलं पाहिली तर सहाशे रूपये किमतीच्या पुस्तकाची खरेदी ५१० रूपयांनी झालेली आढळेल. ( म्हणजे पंधरा टक्के कमिशन म्हणजे प्रत्यक्षात फक्त नव्वद रूपयांना मिळालेलं पुस्तक बिलात ५१० रूपयांना .असं असल्यावर वाचनसंस्कृतीचा विकास कसा होणार यासाठी प्रकाशकांना ठरवावं लागेल की कुठल्याहीपरिस्थितीत विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये बदल नाही 

पुस्तकांच्या विक्रीची संरचना महाराष्ट्रभर तयार करावी लागेल व त्यामार्फतच पुस्तके विकावी लागतील कुणीप्रकाशकाच्या कार्यालयात जाऊन सवलत मागत असेल तर त्याला बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे .वाचनालयांसाठी हार्डबाऊंड व वैयक्तिक वाचकांसाठी पेपरबॅक पुस्तके अशी विभागणी करावी लागेल महत्त्वाचेम्हणजे ड वर्ग वाचनालयांची संख्या प्रचंड वाढली असून त्यांच्यावर अंकुश नाही परिणामी त्यांची खरेदीसंशसास्पद झाली आहे तेव्हा नवीन वाचनालयांना मान्यता देणे थांबवले पाहिजे जुन्यांसाठी टास्क फोर्स 'स्थापून त्यांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवावे लागतील पाच वर्षे एखादी योजना राबवून तिचे परिणाम तपासून मगपुढे जाता येईल खरी अडचण आहे वाचकांची सामान्य वाचक नेहेमी शांत राहिलेला आहे 

पुस्तकांबाबत त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या पाहिजेत वर्तमानपत्रात जिव्हाळ्याची बातमी आली तरी प्रतिक्रियादेण्याचा कंटाळा वाचक करू लागले आहेत ही उदासीनता घातक आहे गुलजार यांची कविता आहे ...' उम्मीद भीहैघबराहट भी हैकि अब लोग क्या कहेंगे और इससे बडा डर यह हैकही ऐसा ना होकि लोग कुछ भी न कहे ?लोकांच्या प्रतिक्रिया उमटत नाहीत म्हणून हर माल पन्नास रूपये अशांचे निभावते लोक जागृत झाले तर अशीहिंमत राहणार नाही शेवटी लोकशाहीत सगळं येऊन थांबते ते लोकांशी प्रश्न इतकाच आहे की लोकांना कायवाटतं लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला म्हणजे हे प्रकाशक सहाशे पानांच्या पुस्तकांची पन्नास रुपयांची नवी आवृत्तीबाजारात आणणार आहेत का